शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत वृद्धेचा खून करून दागिने पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 19:11 IST

शहरातील गुलजार कॉलनी भागात बिल्कीस बेगम (७६) या घरी एकट्याच राहत होत्या.

परभणी- शहरातील धाररोड भागातील गुलजार कॉलनीत एका वृद्धेचा खून झाल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. खून करुन ५५  हजारांचे दागिणे पळविल्याची तक्रार मयत महिलेच्या मुलाने दिली असून त्यावरुन नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.  या घटनेमुळे परिसरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संदर्भात पोलीस  सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील गुलजार कॉलनी भागात बिल्कीस बेगम (७६) या घरी एकट्याच राहत होत्या. त्यांच्या घरी काम करणारी महिला सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घरी आली तेव्हा आतून दार उघडले जात नव्हते व कुठलाही आवाज येत नसल्याने त्यांनी ही माहिती महिलेच्या मुलास दिली. त्यानंतर बराचवेळ आवाज देऊन प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडून आतमध्ये पाहिले असता बिल्कीस बेगम या मृत्यूमुखी पडल्याचे दिसून आले. 

या प्रकरणी त्यांचा मुलगा मोगल समिउल्ला मिर्झा मोईनउल्ला बेग यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. चोरीच्या उद्देशाने बिल्कीस बेगम यांचा खून करुन त्यांच्या गळ्यातील ५५ हजार रुपयांचे दागिणे पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी