शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वेतनासाठी भर उन्हात मनपा कर्मचाऱ्यांचे कामबंद; जोरदार घोषणाबाजीत प्रशासनाचा निषेध

By राजन मगरुळकर | Updated: April 5, 2023 15:24 IST

कर्मचाऱ्यांना व संघटनेला मंडप टाकण्यासाठीची परवानगी नाकारण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांना भर उन्हात बसावे लागले.

परभणी : महापालिकेतील कर्मचाऱ्यांना थकीत असलेल्या तीन महिन्याचे वेतन तत्काळ अदा करावे, या मागणीसाठी परभणी महापालिका अधिकारी, कर्मचारी महासंघाच्या वतीने बुधवारपासून कामबंद आंदोलनास सुरुवात करण्यात आली. मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर कर्मचाऱ्यांना संपासाठी मंडप टाकण्यास परवानगी नाकारल्यामुळे कर्मचाऱ्यांनी भर उन्हात ठिय्या मांडून घोषणाबाजी केली.

मनपा कर्मचाऱ्यांचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्याचे वेतन थकले आहे. या महिन्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच रमजान ईद असल्याने कर्मचाऱ्यांना थकीत वेतन देण्यात यावे व फेस्टिवल ऍडव्हान्स द्यावा, यासह अन्य दहा मागण्यांसाठी यापूर्वी मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्याकडे कर्मचारी महासंघाने निवेदन दिले होते. मात्र, चार एप्रिलपर्यंत वेतन अदा करण्यात न आल्याने कर्मचारी महासंघाच्या वतीने बुधवारपासून या कामबंद आंदोलनास सुरुवात करण्यात आली. 

मंडप टाकण्यासाठीची परवानगी नाकारली बुधवारी सकाळी मनपा कार्यालय परिसरात अकरा ते साडेअकरा दरम्यान कर्मचारी दाखल झाले. त्यांनी घोषणाबाजी केली. सदरिल ठिकाणी कर्मचाऱ्यांना व संघटनेला मंडप टाकण्यासाठीची परवानगी नाकारण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांना भर उन्हात बसावे लागले. कर्मचाऱ्यांनी या धोरणाचा निषेध नोंदविला. आंदोलनात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नजम खान, उपाध्यक्ष श्याम रेंगे, सरचिटणीस विकास रत्नपारखे, के.के.आंधळे, अनुसयाबाई जोगदंड, अभिजीत कुलकर्णी यांच्यासह जवळपास सातशे कर्मचारी सहभागी झाले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन