शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'मी जिंवत आहे!'; कृषी अधिकाऱ्याने कामावर कार्यरत ६ मजुरांना दाखविले मयत

By मारोती जुंबडे | Updated: September 19, 2023 17:04 IST

मजुरांच्या आंदोलनानंतर कामावर रुजू होण्याचे दिले आदेश

परभणी : जिल्ह्यातील कृषी विभागांतर्गत गंगाखेड, चिखलठाणा, जिंतूर आणि परभणी या चार कृषी बीज गुणन केंद्रात कार्यरत सहा शेतमजुरांची कार्यालयीन अभिलेखात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षकांनी केलेला हा प्रकार मजुरांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी सोमवारी विविध ठिकाणच्या मजुरांसोबत जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.

गंगाखेड तालुका कृषी बीज केंद्रात शंकर थावरू राठोड, गंगूबाई राम जाधव, शिवाजी थावरू राठोड, जळबा रंगनाथ भालेराव हे सर्व जण, चिकलठाण्यात (ता. सेलू) हरिभाऊ नाथोबा वाघ तर परभणी फळ रोपवाटिकामध्ये कार्यरत हलीमाबी जैनुद्दीन या मजुरांना मयत दाखविण्यात आले. शेतमजुरास वर्षात २४० दिवस काम केले असता, त्यांना शासकीय सेवेत समावून घेण्याचा २०१९ मधील निर्णय आहे. या कामगारांसंदर्भातील पूर्वीच्या कायद्यानुसार त्यांना कृषी विभागाने कायम करणे आवश्यक आहे. असे असतानाही जिल्ह्यातील काही शेतमजूर या लाभापासून वंचित आहेत. त्यांना कायम करण्याऐवजी त्यातीलच काही मजुरांना विविध कारणे दाखवून अपात्र करत कामावरून कमी केले. तेवढेच नव्हे, तर सहा मजुरांना मयत म्हणून दाखविले. हा प्रकार मजुरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हा कृषी कार्यालयात आंदोलन केले. त्यानंतर आमदार राहुल पाटील यांनी आंदोलनस्थळी मजुरांची भेट घेऊन प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हरणे यांची भेट घेऊन जाब विचारला. यावर त्यांनी तातडीने चूक दुरुस्त करून मजुरांना कामावर रुजू होण्याचे पत्र दिले.

कामावर रुजू करण्याचे दिले पत्रशिवाजी राठोड, शंकर राठोड तालुका बीज केंद्र गंगाखेड यांना उद्यापासून वयाच्या दाखल्याप्रमाणे गंगाखेडमध्ये कामावर घेण्यात येईल. त्याचबरोबर थकबाकी व नियमाप्रमाणे त्यांना महागाई भत्ता अनुदान मागणी करून त्यांना नियमाप्रमाणे कोर्ट आदेशाप्रमाणे मजुरी वेतन अदा करण्यात येईल, न्याय निर्णयाच्या अनुषंगाने सुधारित प्रस्ताव आयुक्तालय कार्यालयास सादर करणार असल्याचे पत्र उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे यांनी संबंधित आंदोलकांना दिले.

न्यायालयीन लढा लढणारचूक झालेली कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली असता, त्यांनी त्या मजुरांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश दिले; परंतु जाणीवपूर्वक अशा प्रकारचा खोडसाळपणा करणाऱ्या तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयीन लढा लढणार आहोत.- बळवंत मोरे, शेतकरी शेतमजूर पंचायत, राज्य उपाध्यक्ष

कृषी खात्याचे पाप जिवंत माणसाला मृत घोषित करण्याचे पाप या कृषी खात्याने केले आहे. दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, मजुरांना महागाई भत्ता देण्यात यावा, २४० दिवस काम करणाऱ्या मजुरांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे.- डॉ. राहुल पाटील, आमदार

नजर चुकीने झालेपंधरा दिवसांपुर्वी कृषी आयुक्तालयात मयत, अपात्र मजुरांचा प्रस्ताव पाठवला होता. यात नजर चुकीने काही मजुरांना मयत दाखविण्यात आले होते. परंतु, चुक लक्ष्यात आल्यावर आम्ही सुधारित प्रस्ताव तातडीने वरिष्ठांना पाठविला आहे.- आर.बी. हरणे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणी