शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पाण्याची बॉटल मागवत हॉटेलचा गल्ला केला साफ; पोलिसांनी पाठलाग करत चौघांना केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 18:24 IST

आरोपींच्या ताब्यातील रिक्षामध्ये तलवार, गज आढळून आढळून आले आहेत.

ठळक मुद्देघरफोडी करणारी सराईत टोळी अटकेत

देवगावफाटा ( परभणी : रस्त्यावरील हॉटेल चालकास उठवून पाण्याची बॉटल मागवली. तो बॉटल आणण्यास जाताच हॉटेलचा गल्ला साफ केल्याची घटना शनिवारी पहाटे देवगावफाटा येथे घडली. प्रसंगावधान राखत हॉटेल चालकाने पोलिसांनी संपके केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रिक्षातून फरार झालेल्या चौघांना लागलीच ताब्यात घेतले आहे. 

देवगावफाटा येथील हॉटेल चालक एकनाथ मधुकर गरड शुक्रवारी रात्री  हॉटेलमध्ये झोपले होते. शनिवारी पहाटे १.३० वाजेच्या सुमारास एका ऑटोरिक्षामधून (क्र.एम एच २० ई एफ ६८०९) चौघेजण हॉटेलमध्ये आले. त्यांनी गरड यांना झोपेतून उठवून पाण्याची बॉटल मागीतली. गरड पाण्याची बॉटल आणण्यासाठी गेले असता चोरट्यांनी गल्यातील १ हजार रुपये काढून घेत रिक्षातून सेलूच्या दिशेने गेले. एकनाथ गरड यांनी घटनेची माहिती चारठाणा पोलीसांना दिली. पोलीस निरीक्षक बळवंत जमादार, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप आलापूरकर, बीट जमादार गुलाब भिसे, कर्मचारी शिवदास सुर्यवंशी, विष्णुदास गरुड, प्रल्हाद भानुसे यांनी लागलीच घटनास्थळ गाठले.

यानंतर पोलिसांनी एकनाथ गरड, जिजाभाऊ पवार, प्रदिप मोरे यांना सोबत घेत रिक्षाचा शोध घेतला.  मोरेगांव नजीक पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेतले. प्रेम भिकन नरवाडे, प्रतीक उर्फ साईनाथ गणेश खडके, आनंद रवींद्र पगडे, शेख मुस्ताफा शेख मुबारक ( सर्व रा. औरंगाबाद) असे आरोपींची नावे आहेत. यावेळी रिक्षामध्ये तलवार ,गज आढळून आढळून आले. यावरून हे घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांच्याकडून इतर अनेक गुन्हे उघडकीस येऊ शकतात असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. गरड यांच्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द भांदवी कलम ३७९ व  शस्रअधिनियम १९५९ चे कलम ४,२५  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप अलापुरकर हे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी