शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनास यश, जिल्हाधिका-यांनी दिले स्वतंत्र विद्यार्थी बस सुरु करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 18:15 IST

केवळ विद्यार्थ्यांसाठी 'परभणी-पालम' ही बस स्वतंत्ररित्या सोडण्यात यावी, या मागणीसाठी सात गावांतील विद्यार्थ्यांनी आज सकाळी अचानक जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले.

 परभणी, दि. 18 : केवळ विद्यार्थ्यांसाठी 'परभणी-पालम' ही बस स्वतंत्ररित्या सोडण्यात यावी, या मागणीसाठी सात गावांतील विद्यार्थ्यांनी आज सकाळी अचानक जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनीही तात्काळ केवळ विद्यार्थ्यांसाठी बस सोडण्याचे आदेश दिले. 

परभणी आगारातून सुटणा-या 'परभणी- पालम' या बसमधून इतर प्रवास्यांसोबत धानोरा काळे, कळगाव वाडी, ताडकळस, सिरसकळस, बलसा, मिरखेल, पिंगळी या 7 गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी परभणी शहराकडे दररोज ये-जा करतात़. या विद्यार्थ्यांना महामंडळाकडून विद्यार्थी पासेसही घेतल्या आहेत़. परंतु, या बसमधून कायम क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असतात. यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही़.  परिणामी, अनेक विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात येण्यासाठी उशिर होतो़. अनेक विद्यार्थ्यांचे यातून शैक्षणिक नुकसान होते.यावर विद्यार्थ्यांनी अनेकदा 'परभणी- पालम' ही बस केवळ विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्ररित्या सोडण्यात यावी अशी मागणी केली होती. परंतु, यास यश आले नाही. शेवटी आज या 7 गावच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्या निवासस्थानी सकाळी ७़.३० ते १० असे जवळपास अडीच तास ठिय्या आंदोलन केले़.

आंदोलनास आले यशयावेळी विद्यार्थ्याच्या या आंदोलनाची जिल्हाधिकारी यांनी दखल घेत त्यांना कार्यालयात येण्यास सांगितले. यानंतर त्यांनी  एसटी महामंडळाच्या अधिका-यांना बोलावून घेतले. या प्रश्नांवर त्यांच्याकडून माहिती घेत जिल्हाधिका-यांनी विद्यार्थ्यांसमक्ष 'परभणी-पालम' ही बस केवळ विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्ररित्या सोडावी असे आदेश दिले़. यावर एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक सिरसाठ यांनी मंगळवारपासून बस उपलब्ध होईल असे आश्वासन दिले. बसची मागणी पूर्ण झाल्याची खात्री होताच यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले़. या आंदोलनात ऋषीकेश सुकनूर, मोनिका देशमुख, सचिन डहाळे, केदार पाठक, ऋषीकेश वाघमारे, सोहेल शेख, तान्हाजी घोडके, अशोक अंभोरे आदींसह ६० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. 

प्रशासनाची उडाली धांदलविद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी अचानक ठिय्या आंदोलन केले़. त्यामुळे पोलीस कर्मचा-यांची चांगलीच धांदल उडाली़.पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला़ परंतु, विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते़.