शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी योजनेतून 129 हेक्टरवर फळबाग लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 16:26 IST

२०२०-२१  या वर्षासाठी जिल्ह्यात ५८४ हेक्टर क्षेत्रावर फळबागा लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

ठळक मुद्दे२१ लाख रुपये खर्चतीन तालुक्यातील एकानेही घेतला नाही लाभ

परभणी :  महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात सप्टेंबर अखेरपर्यंत १२९ हेक्टरवर फळबागांची लागवड करण्यात आली असून या कामांवर आतापर्यंत २१ लाख ६९ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. 

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांच्या हाताला काम मिळावे, या उद्देशाने विविध शासकीय विभागांतून कामांचे नियोजन केले जाते. कृषी विभागांतर्गत फळबाग लागवडीची कामे या योजनेतून घेतली जातात. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळते. शिवाय फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होतो. २०२०-२१  या वर्षासाठी जिल्ह्यात ५८४ हेक्टर क्षेत्रावर फळबागा लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट निर्माण झाले. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामांनाही फटका बसला आहे. मध्यंतरी ४ ते ५ महिने ही कामे बंद होती.

सप्टेंबर महिना अखेर रोहयोतून फळबाग लागवड करण्यासाठी १ हजार ६४९ लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. १ हजार ५७२ लाभार्थ्यांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात केवळ १५४ लाभार्थ्यांनी फळबागांची लागवड केली आहे. सुमारे १२९ हेक्टर क्षेत्रावर या योजनेतून फळबाग लागवड करण्यात आली असून त्यावर  १ कोटी १८ लाख ५७ हजार रुपये अपेक्षित आहे. प्रत्यक्षात केवळ २१ लाख ६९ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. जिल्ह्याचे वार्षिक उद्दिष्ट लक्षात घेता फळबाग क्षेत्र वाढविण्यासाठी प्रशासनाला प्राधान्याने कामे हाती घ्यावी लागणार आहेत. 

२१ लाखांचा खर्चरोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत २१ लाख ६९ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. गंगाखेड तालुक्यामध्ये २ लाख रुपये, मानवत तालुक्यामध्येे १४ लाख, पाथरी ३ लाख ९४ हजार, पूर्णा ९१ हजार आणि सोनपेठ तालुक्यात ७६ हजार रुपयांचा खर्च या योजनेवर झाला आहे. 

मानवत तालुक्यामध्ये सर्वाधिक प्रतिसादरोहयोतून फळबाग लागवड योजनेला मानवत तालुक्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. या तालुक्यासाठी केवळ ३५ हेक्टर उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात ७८ लाभार्थ्यांनी ७०.७० हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड केली आहे. जिंतूर तालुक्यामध्ये १४.९५ हेक्टर, परभणी ३६.३० हेक्टर, पूर्णा ३, सेलू २.९ आणि सोनपेठ तालुक्यात १.८ हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड झाली आहे. गंगाखेड, पालम, पाथरी या तालुक्यात मात्र एकाही लाभार्थ्याने योजनेचा लाभ घेतला नाही. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती