शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्ष क्षीण; जनतेलाच विरोधी भूमिका घ्यावी लागेल : जिग्नेश मेवाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 16:55 IST

भाजपला देशात विरोधी पक्षच नको आहे आणि त्या दृष्टीनेच पावले उचलली जात आहेत़

ठळक मुद्दे रोजगार देण्याऐवजी रोजगार हिसकावून घेतला जात आहेसर्वसामान्य नागरिकांनाही ईव्हीएमविषयी शंका

परभणी : काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा करणाऱ्या भाजपला देशात विरोधी पक्षच नको आहे आणि त्या दृष्टीनेच पावले उचलली जात आहेत़ विरोधी पक्ष क्षीण झाले असून, देशभरात नैराश्याचे वातावरण आहे़ त्यामुळे जनतेलाच आता विरोधी भूमिका घ्यावी लागेल, असे मत आ़ जिग्नेश मेवाणी यांनी येथे व्यक्त केले़ 

राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या माध्यमातून जिग्नेश मेवाणी यांनी ‘संविधान बचाव देश बचाओ’ या अभियानांतर्गत संविधान सन्मानयात्रा सुरू केली आहे़ मंगळवारी ही यात्रा परभणीत दाखल झाली़ या निमित्ताने आ़ जिग्नेश मेवाणी यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, २ कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते़ मात्र प्रत्यक्षात त्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे़ देशभरात मंदीची लाट आहे़ विविध कंपन्या रोजगार देण्याऐवजी असलेल्या कर्मचाऱ्यांना काढत आहेत़ त्यामुळे रोजगार देण्याऐवजी रोजगार हिसकावून घेतला जात आहे, ‘हेच का अच्छे दिन’  असा सवाल त्यांनी केला.

आ़ मेवाणी म्हणाले, ईव्हीएम मशीनमध्ये गडबडी असल्याचा कुठलाही आधार नाही़ परंतु, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिकांनाही ईव्हीएमविषयी शंका निर्माण झाली आहे़ तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रामाणिक असतील तर त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले़ या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे जिल्हाध्यक्ष रवी सोनकांबळे, निवृत्ती सांगवे, निलेश देशभ्रतार, दिलीप साळवे, संजय टेकुळे, रोहिदास लांडगे आदींची उपस्थिती होती़ 

गुजरात मॉडेलच्या बहकाव्यात येऊ नयेगुजरात मॉडेलचा कांगावा केला जात आहे़ परंतु, या बहकाव्यात राज्यातील नागरिकांनी येऊ नये. २२ वर्षांत देशात ३ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्येशी देणे घेणे नसल्याचे दिसत आहे़ या राज्यात संविधान मोडून काढणे आणि त्या जागी मनुस्मृतीचा अवलंब करणे ही एकमेव संघप्रणित कार्यप्रणाली सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला़  दाभोळकर यांची हत्या संविधान मूल्यांची हत्या आहे, असे सांगून राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन करणे, विज्ञानवादी विचार रुजविणे आणि विपक्ष म्हणून जनतेची जागृती करणे यासाठी ही यात्रा काढली असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Jignesh Mevaniजिग्नेश मेवानीparabhaniपरभणीBJPभाजपा