शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार प्रवीण मुळी हल्ला प्रकरणात एकाला अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 17:24 IST

आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून पूर्वी त्याच्यावर विविध पोलिस स्थानकात पाच गुन्हे दाखल आहेत.

जिंतूर (परभणी ) : येलदरी येथील पत्रकार प्रवीण मुळी यांच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीस न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रशांत मुळी व प्रवीण मुळी यांच्या घरावर 27 मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. संपूर्ण महाराष्ट्रात घटनेचे पडसाद उमटल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाच्या मुळाशी जात तपास केला. ठोस माहिती आणि पुराव्यावरून पोलिसांनी अनिल देविदास वाकळे यास ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला 6 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

संशयित आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून पूर्वी त्याच्यावर विविध पोलिस स्थानकात पाच गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी येलदरी येथील मारूती मंदिराची साऊंड सिस्टिमची चोरी वाकळे याने केल्याचे पत्रकार प्रवीण मुळी यांनी उजेडात आणले होते. तसेच येलदरी येथील एका मोठ्या चोरीच्या प्रकरणाची माहिती सुद्धा मुळी यांना होती. यातूनच वाकळे याने हे कृत्य केले असावे असा पोलिसांचा कयास आहे. वाकळे सोबत आणखी कोणी होते का याचा पोलिस शोध घेत असून इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस ए शेख, पोलीस शिपाई पी एस तुपसुंदर , राजेश सरोदे ,व्यकटेश नरवाडे आदींनी केली.  

टॅग्स :parabhaniपरभणीArrestअटकPoliceपोलिसJournalistपत्रकार