शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे! भररस्त्यातील विद्युत रोहित्राने अचानक घेतला पेट; परभणीच्या साई कॉर्नर येथील घटना

By राजन मगरुळकर | Updated: April 13, 2023 14:46 IST

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.

परभणी : शहरातील अपना कॉर्नर ते खंडोबा बाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर साई कॉर्नर येथे रस्त्याच्या लगत असलेल्या एका विद्युत रोहित्राने पेट घेतल्याची घटना आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही वेळातच ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.

परभणी शहरातील मुख्य वसाहत असलेल्या अपना कॉर्नर ते खंडोबा बाजार रस्त्यावर साई कॉर्नर परिसर आहे. येथे झाडाच्या बाजूला एका मेडिकल शेजारी महावितरणचे विद्युत रोहित्र आहे. या विद्युत रोहित्राला आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग हळूहळू वाढत गेली. सदरील प्रकार परिसरातील नागरिक व रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळविला. त्यावरून परभणी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी दीपक कानोडे, वाहन चालक संतोष पोंदाळ हे वाहनासह घटनास्थळी दाखल झाले.

आगीचे कारण अस्पष्टआग तत्काळ नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाने पाण्याचा फवारा करून काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआग