शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा परिषदेत अभियंत्याच्या पदभारासाठी अधिकाऱ्यांचे लॉबिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 12:49 IST

 जिल्हा परिषदेतील रिक्त असलेल्या बांधकाम व लघुसिंचन विभागातील कार्यकारी व उपअभियंत्यांचा पदभार मिळावा, यासाठी काही कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून पदाधिकाऱ्यांमार्फत लॉबिंग केले जात आहे.

परभणी :  जिल्हा परिषदेतील रिक्त असलेल्या बांधकाम व लघुसिंचन विभागातील कार्यकारी व उपअभियंत्यांचा पदभार मिळावा, यासाठी काही कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून पदाधिकाऱ्यांमार्फत लॉबिंग केले जात आहे.

परभणी जिल्हा परिषदेतील लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता वाघ हे वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांचा पदभार पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वसुकर यांच्याकडे देण्यात आला. वसुकर हे ३१ जुलैला सेवानिवृत्त होणार आहेत. सेवानिवृत्तीपूूर्वी कोणतेही झंझट नको, म्हणून त्यांनी १० दिवसांपूर्वी या विभागाचा पदभार सोडला. सध्या परभणीचे लघुसिंचनचे उपअभियंता कोणगुते यांच्याकडे कार्यकारी अभियंत्यांचा पदभार आहे. विशेष म्हणजे, कोणगुते यांना जिंतूर उपविभागाचा पदभार देण्यात आला होता. त्यांनी काही दिवस या पदावरील कामकाजही पाहिले; परंतु, प्रकृती बरोबर नसल्याचे कारण सांगून त्यांनी प्रशासनास जिंतूरचा पदभार काढण्याची विनंती केली. तसे दोन पत्र जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे त्यांचा जिंतूरचा पदभार काढण्यात आला. अन् आता त्यांना कार्यकारी अभियंत्यांचाच पदभार देण्यात आला आहे. विशेष म्हणजे जिंतूरचा पदभार नाकारणारे कोणगुते यांनी परभणीतील कार्यकारी अभियंत्याचा पदभार मात्र तातडीने स्वीकारला.

या पदाचा पदभार आपल्याकडेच रहावा, याकरीता काही कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून सध्या लॉबिंग केले जात आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्यांना हाताशी धरुन अधिकाऱ्यांकडे वशिला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. असाच काहीसा प्रकार बांधकाम विभागातही होत आहे. या विभागाचे कार्यकारी अभियंता गोवंदे यांची गेल्या महिन्यात मुंबईला बदली झाली. त्यानंतर त्यांचा पदभार परभणीचे उपअभियंता उडानशीव यांना देण्यात आला. उडानशीव यांची १० दिवसांपूर्वी नांदेड येथे सार्वजनिक बांधकाम विभागात बदली झाली. त्यामुळे ते नांदेडला जाण्यासाठी उत्सुक आहेत; परंतु, परभणीत सध्या या पदाचा पदभार घेईल, असा अधिकारी उपलब्ध नसल्याने त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आले नाही. हा पदभार आपल्याकडे यावा, यासाठीही काही जणांकडून प्रयत्न केले जात आहेत. 

उपअभियंत्यांच्या पदभारासाठी अधिकाऱ्यांवर दबाव बांधकाम विभागात जिंतूर, परभणी आदी उपअभियंत्यांची पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांचा पदभार आपणाला मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या काही कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात लॉबिंग केले जात आहे. यासाठी जि.प.सदस्यांना हाताशी धरुन अधिकाऱ्यांवरच दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. विशेष म्हणजे आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याला पदभार मिळावा, या करीता सत्ताधारी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षातील काही सदस्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांची भेट घेतली व त्यांना त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पदभार देण्यासाठी साकडे घातले. मुळीक यांनी मात्र याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. 

टॅग्स :Parbhani z pपरभणी जिल्हा परिषदTransferबदली