शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

चिखलमय रस्त्याने काढला अधिकाऱ्यांचा घाम; पाहणीसाठी आलेल्या तहसीलदारांची गाडी चिखलात फसली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 13:23 IST

गावकऱ्यांच्या यातना या अधिकाऱ्यांना प्रत्यक्षपणे अनुभवायला मिळाल्या. तीन किलोमीटर प्रवास करीत अखेर गावात अधिकाऱ्यांचा फौजफाटा दाखल झाला.

ठळक मुद्देतीन तास पायपीट करून अधिकाऱ्यांनी घेतली ग्रामसभाग्रामसभा संपताच वीजपुरवठा खंडित

पूर्णा (परभणी )  : तालुक्यातील माहेर गावचा मुख्य रस्ता पाहण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रस्ता नसल्याने मंगळवारी ( दि 29 ) तीन किलोमीटर चिखल दगडाच्या रस्त्यातून पायी प्रवास करावा लागला. यावेळी तहसीलदारांची गाडी चिखलात फसल्याने चक्क ट्रॅक्टर लावून बाहेर काढावी लागली. ग्रामस्थांच्या रोजच्या जीवघेण्या समस्यांचा प्रत्येक्ष अनुभव यावेळी अधिकाऱ्यांना आला. 

ताडकळस परिसरात असलेल्या माहेर या गावच्या रस्त्याचा प्रश्न काही दिवसापूर्वी चव्हाट्यावर आला होता. या रस्त्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळ यांनी दखल घेतली. गावाला भेट घेऊन त्यांनी विविध समस्या जाणून घेतल्या. तालुकास्तरीय सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थित 29 जून रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेसाठी जिल्हा परिषदचे उप कार्यकारी मुख्यधिकरी ओम प्रकाश यादव, तहसीलदार पल्लवी टेमकर, गटविकास अधिकारी अमित राठोड, आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे, गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा साबळे, कार्यकारी अभियंता यमडवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी वानखेडे, तालुका कृषी अधिकारी तांबिले, विस्ताराधिकारी सूरेवाड, तलाठी अमदुरे यांच्यासह महावितरण आरोग्य विभागाचे अधिकारी माहेर गावाच्या दिशेने सकाळी निघाले. मात्र, गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा गावापासून तीन किलोमीटर अलीकडेच थांबवावा लागला. 

गावात जाणारा मुख्यरस्ता हा चिखलमय असल्याने वाहने पुढे जाऊ शकत नव्हते. याच रस्त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करताना तहसीलदार पल्लवी टेमकर यांची गाडी चिखलात फसली होती. काही वेळाने गावकऱ्यांच्या मदतीने ट्रॅक्टरच्या सहय्याने त्यांची गाडी बाहेर काढावी लागली. ग्रामसभेसाठी आलेल्या सर्वच अधिकाऱ्यांना तीन किलोमीटरचा चिखल दगडांचा रस्ता तुडवत माहेर गावामध्ये प्रवेश करावा लागला. गावकऱ्यांच्या यातना या अधिकाऱ्यांना प्रत्यक्षपणे अनुभवायला मिळाल्या. तीन किलोमीटर प्रवास करीत अखेर गावात अधिकाऱ्यांचा फौजफाटा दाखल झाला. गावकऱ्यांच्यावतीने उपस्थित अधिकाऱ्यांचे स्वागत करून ग्रामसंवाद कार्यक्रमास सुरुवात झाली. ग्रामस्थांनी प्रमुख रस्त्याच्या मागणीसह पेयजल योजना, शाळा दुरुस्ती, स्वच्छता, आरोग्य सुविधा, अखंडित वीज पुरवठा याची मागणी केली. गावकऱ्यांना लवकरात लवकर सुविधा पुरवण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले.  

ग्रामसभा संपताच वीजपुरवठा खंडितमाहेर गावाच्या रस्त्यासोबतच या गावातील वीजपुरवठा प्रश्नही महत्त्वाचा आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ग्रामसभेच्या दिवशी दिवसभर सुरळीत सुरू असलेला वीज पुरवठा अधिकारी गावाबाहेर जाताच खंडित करण्यात आला.

टॅग्स :parabhaniपरभणीroad safetyरस्ते सुरक्षाParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी