//////////////////// गायकवाडी////////////////////////)))))
परभणी : कर्मवीर दादासाहेब ////////////////////गायकवाडी//////////////////////// सबलीकरण स्वाभिमानी योजनेंतर्गत जमीन खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात आक्षेप असल्यास समाजकल्याणच्या सहायक आयुक्तांकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पाण्याचा प्रश्न कायम
परभणी : शहरात नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झाली असली तरी नागरिकांना आठ ते दहा दिवसांतून एक वेळ पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
नियमांचा बोजवारा
परभणी : येथील बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली असून, कोरोनाच्या नियमांचा बोजवारा उडविला जात आहे. बसमध्येही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे कोरोना पसरण्याची भीती आहे.
महामार्गावर अतिक्रमण
परभणी : शहरातील जिंतूर रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. रस्त्याच्या कडेने मोठ्या प्रमाणात किरकोळ विक्रेत्यांनी स्टॉल्स लावले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून, उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
उत्पन्न वाढण्याची शक्यता
परभणी : जिल्ह्यात यावर्षीच्या रबी हंगामात गव्हाचा पेरा वाढला आहे. त्याचप्रमाणे या हंगामात वेळेवर पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात गव्हाचे उत्पादन वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.