डेल्टा प्लस बाधित रूग्णांचा संसर्ग होत असल्याच्या कारणावरून २८ जूनपासून जिल्ह्यात विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे हॉटेल चालकांसह हॉटेल काम करणारे कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून व्यवसायात अडचणी येत असल्याने अर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
n जिल्ह्यात हॉटेल सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस दुपारी ४ पर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
n आठवड्यातील ५ दिवसांच्या कालावधीत ५० टक्के क्षमतेसह हॉटेल सुरू ठेवता येणार आहे.
n शनिवार व रविवार हे हॉटेल बंद ठेवून फक्त घरपोहोच सेवा देण्यास प्रशासनाच्या वतीने परवानगी देण्यात आली आहे.
हॉटेल काम करून घराची उपजीविका भागवितो. व्यवसाय नसल्याने पगार कमी झाला आहे. अशात पुन्हा निर्बंध लागू केल्याने अडचण येणार आहे. त्यामुळे शासनाने हॉटेल कामगारांना अर्थिक मदत द्यावी.
-अमोल मस्के, परभणी
दररोज हॉटेलमध्ये काम केले तरच घर चालते. त्यामुळे शनिवार व रविवार बंद ठेवायचे असेल तर शासनाने अगोदर सर्व हॉटेल कामगारांना अर्थिक मदत द्यावी. त्यानंतर निर्बंध लागू करावेत.
-जिलानी शेख
मार्च २०२० पासून नेहमी निर्बंधामुळे हॉटेल बंद ठेवावे लागत आहे. यामुळे हा व्यवसायच धोक्यात आला आहे. इतर व्यवसायापेक्षा हा वेगळा व्यवसाय आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी.
- देवीलाल जोशी, बोरी
गेल्या सव्वा वर्षापासून लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे हॉटेल व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे. हॉटेल बंद ठेवायचे तर बँकाच्या कर्जाचे हप्ते, नोकरांचा पगार, भाडे कसे देणार, असा प्रश्न पडला आहे. प्रशासनाने शिथीलता द्यावी.
- जितेंद्र खैराजानी, परभणी