शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील महावितरणाच्या २१ अभियंत्यांना बजावल्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 19:34 IST

वीज वितरण कंपनीतील २१ अभियंत्यांना थकबाकीच्या कारणास्तव १९ मार्च रोजी अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे यांनी कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत़ त्यामुळे अभियंत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे़ 

जिंतूर : वीज वितरण कंपनीतील २१ अभियंत्यांना थकबाकीच्या कारणास्तव १९ मार्च रोजी अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे यांनी कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत़ त्यामुळे अभियंत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे़ 

जिल्ह्यातील १० उपविभागांतर्गत महावितरणच्या वतीने जवळपास २ लाख ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो़ यामध्ये औद्योगिक, घरगुती, लघुदाब व कृषीपंप धारकांचा समावेश आहे़ या ग्राहकांना महिन्याकाठी महावितरणच्या वतीने वीज बिल दिले जाते़ परंतु, बहुतांश ग्राहकांनी महावितरणचे वीज बिल वेळेत न भरल्याने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी झाली आहे़ सध्या मार्च एंडींग चालू असल्याने महावितरण कंपनीने १ मार्चपासून शून्य थकबाकी विशेष मोहीम सुरू केली आहे़ या मोहिमेंतर्गत दर दिवशी अनेक थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करून ज्या ग्राहकांकडे थकबाकी आहे, त्या ग्राहकांची वसुली सुरू आहे़ परंतु, ज्या उपविभागात समाधानकारक थकबाकी वसुली झाली नाही़ त्या उपविभागातील २१ अभियंत्यांना अधीक्षक अभियंता कांबळे यांनी १९ मार्च रोजी थकबाकी वसुलीच्या कारणास्तव कारणे दाखवा नोटीस  बजावली आहे़ त्यामुळे अभियंत्यांमध्ये खळबळ उडाली आहे़ 

दरम्यान, गतवर्षीपेक्षा यावर्षी समाधानकारक वसुली झाली आहे़ त्यामुळे अधीक्षक अभियंत्यांनी पाठविलेल्या कारणे दाखवा नोटिसांचा पुनर्विचार करून या नोटीस मागे घेण्यात याव्यात, अशी मागणी एस़ई़ ए़ संघटनेच्या वतीने नांदेड परिमंडळातील मुख्य अभियंता यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे़ निवेदनावर एसईए संघटनेचे सहसचिव नितीन थिटे यांची स्वाक्षरी आहे.

‘एस.ई.ए.’कडून आत्मक्लेश आंदोलनमार्च २०१८ मध्ये विक्रमी वसुली व्हावी, या उद्देशाने सर्व अभियंते व कर्मचार्‍यांनी प्रयत्न केले. गतवर्षीपेक्षा यावर्षी सर्वाधिक वसुलीही केली आहे़ परंतु, परभणी  मंडळ कार्यालयांतर्गत कार्यरत जवळपास २१ अभियंत्यांना महावितरणचे अधीक्षक अभियंता कांबळे यांनी थकबाकीच्या कारणास्तव कारणे दाखवा नोटीसा दिल्या. या नोटिसा परत न घेतल्यास २६ मार्च रोजी महावितरण कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. तसेच सलग ७२ तास आपापल्या कार्यालयात कार्यरत राहून आत्मक्लेश आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती एसईए संघटनेचे सहसचिव नितीन थिटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

समाधानकारक काम न केलेल्यांना नोटीसा महावितरण कंपनीच्या वतीने शून्य थकबाकी वसुली मोहीम राबविण्यात येत आहे़ यामध्ये अनेक ग्राहकांची थकबाकी वसुली झाली आहे़ परंतु, ज्या अभियंत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत समाधानकारक  काम केले नाही़, त्या अभियंत्यांना कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत़ त्यामुळे कोणाचे खच्चीकरण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही़- यशवंत कांबळे, अधीक्षक अभियंता, परभणी

टॅग्स :mahavitaranमहावितरणparabhaniपरभणीMONEYपैसा