एडी सुई उपलब्ध नसेल तर लसीकरणासाठी होणाऱ्या खर्चापैकी २० टक्के खर्चातून डिस्पोजेबल सुई खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे डिस्पोजेबल सुईच्या माध्यमातून लसीकरण करणे शक्य आहे. या सुईचा वापर करता लस वाया जाण्याचा कोणतीही भीती नाही. डिस्पोजेबल सुईनेही चांगल्या पद्धतीने लसीकरण केले जाऊ शकते, असे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.
काय आहे एडी सिरिंज?
एडी सिरिंज म्हणजे ॲटो डिसेबल सिरिंज. या सिरिंजमध्ये केवळ एक वेळाच लस देता येते. त्यानंतर ही सुई ऑटोमॅटिक लॉक होते. या सुईने पुन्हा दुसऱ्या वेळेस लसीकरण करता येत नाही.
२ सीसी सिरिंज कशी असते?
२ सीसी सिरिंज म्हणजे २ एम.एल. लस घेता येईल, अशी सिरिंज. या सिरिंजमध्ये जेवढी लस हवी आहे, तेवढी घेऊन समोरच्या व्यक्तीला लस देण्याची सुविधा असते. खुल्या बाजारपेठेत या सिरिंज उपलब्ध आहेत.
लसीकरणासाठी या सुईचादेखील वापर केला जातो. लस देणाऱ्याने डोस घेताना काळजीपूर्वक डोस घेतल्यास तो वाया जाण्याची शक्यता कमी असते.
१००००
सिरिंज लागतात रोज जिल्ह्याला
जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून लसीकरणाचा वेग वाढला आहे. दररोज सुमारे १० हजार लसीकरण होत आहे. मागील आठवड्याचा लसीकरणाचा वेग लक्षात घेता, दररोज १० हजार सिरिंज जिल्ह्याला लागतात. ही बाब लक्षात घेता सध्या उपलब्ध असलेल्या सिरिंज जिल्ह्यासाठी पुरेशा प्रमाणात आहेत.
वेस्टेजची नाही चिंता
जिल्ह्यात लसींच्या वेस्टेजचे प्रमाणत अत्यल्प आहे. आतापर्यंतच्या नोंदीनुसार कोव्हॅक्सिनच्या वेस्टेजचे प्रमाण १ टक्का तर कोविशिल्डच्या वेस्टेजचे प्रमाण जेमतेम अर्धा टक्के आहे. त्यामुळे यापुढेदेखील वेस्टेजची कोणतीही चिंता नाही.
जिल्ह्यात एडी सिरिंज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे पुरवठा कमी झाला असला तरी कोणतीही चिंता नाही. त्याचप्रमाणे लसीकरणाच्या खर्चातून २० टक्के खर्च सिरिंज खरेदीसाठी मंजूर आहे. त्यामुळे बाजारातूनही सिरिंज खरेदी केल्या जाऊ शकतात.
डॉ.रावजी सोनवणे, लसीकरण प्रमुख.