शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

किनवट येथील मामाच्या घरी जाताना हरवलेला मुलगा सापडला नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 15:54 IST

 दोन दिवसांपूर्वी किनवट (जि. नांदेड) येथून हरवलेला ७ वर्षाचा मुलगा नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये नांदेड ते पूर्णा दरम्यान सापडला आहे.

ठळक मुद्दे४ एप्रिल रोजी काही प्रवाशांना नागपूरहून मुंबईकडे जाणा-या नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये ७ वर्षाचा मुलगा सापडला.. प्रवाशांनी या मुलास पूर्णा येथील रेल्वे पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचा-यांकडे सुपूर्द केले.

पूर्णा :  दोन दिवसांपूर्वी किनवट (जि. नांदेड) येथून हरवलेला ७ वर्षाचा मुलगा नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये नांदेड ते पूर्णा दरम्यान सापडला आहे. पोलीस व प्रवाशांनी सतर्कता दाखवित हरवलेल्या मुलास बुधवारी पालकांच्या स्वाधीन केले.

४ एप्रिल रोजी काही प्रवाशांना नागपूरहून मुंबईकडे जाणा-या नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये ७ वर्षाचा मुलगा सापडला. प्रवाशांनी या मुलास पूर्णा येथील रेल्वे पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचा-यांकडे सुपूर्द केले. जमादार सागर पेठे, पो.शि. राठोड यांनी सापडलेल्या मुलाला विश्वासात घेऊन माहिती विचारली. घाबरलेल्या स्थितीत असलेल्या मुलाने आपण किनवट येथील असून गणेश अंकूश राठोड असे नाव असल्याचे सांगितले. त्यावरुन नांदेड रेल्वे पोलिसांना ही माहिती  देण्यात आली. नांदेड पोलिसांनी किनवट येथील पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता ४ एप्रिल रोजी सकाळी शिवाजीनगर किनवट येथून या नावाचा मुलगा हरवल्याची नोंद मिळाली. व्हॉटस्अ‍ॅपवरून पूर्णा पोलिसांनी सापडलेल्या मुलाचा फोटो किनवट पोलिसांना पाठविला. त्यानंतर सापडलेला मुलगा गणेश राठोड असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गणेश राठोड याचे आई-वडील, आजी व मामा यांनी बुधवारी रात्री १२ वाजता पूर्णा गाठले. पोलिसांनी शहानिशा करून मुलाला आई-वडिलांच्या ताब्यात दिले. 

मामाच्या घरी जाण्यासाठी निघाला होता मुलगाबुधवारी सकाळी गणेश राठोड हा किनवट येथे जवळच राहत असलेल्या मामाच्या घरी जाण्यासाठी निघाला होता. परंतु, बराच वेळ तो परतला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी गणेश राठोड याचा शोध घेतला. परंतु, मुलगा सापडत नसल्याने अंकुश राठोड यांनी पोलीस ठाण्यामध्ये मुलगा हरवल्याची तक्रार दिली होती. प्रवासी व पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगा सापडला असून े पोलिसांच्या रुपात देवच भेटल्याचे नातेवाईकांनी सांगितले. 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीparabhaniपरभणीPoliceपोलिस