शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नांदेड-पुणे महामार्गावर पडले जीवघेणे खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:10 IST

शहरातून जाणाऱ्या नांदेड-पुणे महामार्गावर रस्त्याच्या मधोमध जागोजागी गुडघ्याएवढे खड्डे पडले आहेत. परिणामी दरदिवशी या खड्यांमुळे घडणाºया छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटनांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): शहरातून जाणाऱ्या नांदेड-पुणे महामार्गावर रस्त्याच्या मधोमध जागोजागी गुडघ्याएवढे खड्डे पडले आहेत. परिणामी दरदिवशी या खड्यांमुळे घडणाºया छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटनांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.गंगाखेड शहरातून जाणाºया नांदेड-पुणे महामार्गावर शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. पावसाचे पाणी साचल्याने हे खड्डे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. शहरातील बसस्थानक रस्त्यावर विष्णूदास फुलवाळकर चौकात रस्त्याच्या मधोमध असलेला गुडघ्याएवढा खड्डा ेदुचाकीचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.या रस्त्यावरून ये-जा करताना दुचाकीसह काही नागरिक खड्यात पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मोठ्या वाहनधारकांनाही येथून वाहने चालविताना मोठी कसरत करून खड्डा चुकविण्याचा प्रयत्न करावा लागत आहे. थोडासा पाऊस पडल्यानंतर रस्त्याच्या बाजूस कचºयाने तुडूंब भरलेल्या नालीतील घाण पाणी थेट रस्त्यावर येऊन रस्त्याच्या मधोमध पडलेल्या भल्या मोठ्या खड्यात साचत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे पाणी खड्यात साचले. परिणामी खड्डा दिसला नसल्याने या रस्त्यावरून जाणारा दुचाकीचालक कुटुंबियांसह खड्यात पडून जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. रस्त्याच्या मध्यभागी पडलेला गुडघ्याएवढा खड्डा कोणाच्या जीवावर उठेल, हे येणारा काळच सांगणार आहे. दरम्यान, नांदेड-पुणे महामार्गावर दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते, असे असतानाही या महामार्गाच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे. या खड्याच्या दुरुस्तीबाबत अनेक वेळा वाहनधारक व नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या; परंतु, झोपेचे सोंग घेऊन काम करणाºया राष्टÑीय महामार्ग विभागाला या खड्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यास वेळ नाही. परिणामी वाहनधारकांसह नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे राष्टÑीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन हा खड्डा दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.शिवसेनेची सा.बां. विभागाकडे धावच्नांदेड-पुणे महामार्गावर रस्त्याच्या मधोमध खड्डा पडला आहे. या रस्त्यावरून भरधाव वेगाने धावणाºया वाहनधारकांच्या लक्षात हा खड्डा येत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. हा खड्डा दुरुस्त करावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे दुरुस्तीची मागणी करण्यात आली.च्निवेदनावर तालुकाप्रमुख अनिल सातपुते, रामकिशन शिंदे, धोंडीबा जाधव, सुभाष देशमुख, मारोती आडे, नागनाथ कदम, अजय चव्हाण, राहुल राठोड, गणेश भालेराव, अभिजित राठोड, विजय चव्हाण, रवी राठोड, माऊली क्षीरसागर, नसिंग भाले, बालाजी उंदरे, विजय मुंडे, नागेश शिंदे, राजेश निळे, किशन मुलगीर आदींच्या स्वाक्षºया आहेत.खड्डे चुकविताना होणारा त्रास दूर करण्याची मागणी४ शहरातून जाणाºया नांदेड-पुणे महामार्गावर, गंगाखेड बसस्थानक ते पोलीस ठाण्याकडे जाणाºया रस्त्यावर, विष्णूदास फुलवाडकर चौक, शनिवार बाजार, बसस्थानकासमोर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करून मार्ग काढावा लागत आहे.४विष्णूदास फुलवाडकर चौक परिसरात रस्त्यावरून जाताना बस व लहान वाहने रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्यात जाऊन आदळत आहेत. या खड्यात पावसाचे पाणी साचल्यानंतर खड्याचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वार खड्यात पडत आहेत.४लहान मोठी वाहने व दुचाकीचालकांना हा खड्डा जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे तत्काळ हा खड्डा बुजवून वाहनधारकांना होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीroad transportरस्ते वाहतूक