शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सातबाऱ्यावरून नाव गायब झाले; दुरुस्तीसाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्याचा तलाठी कार्यालयात मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 19:50 IST

नातेवाईकांची तलाठी आणि तहसीलदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पाथरी (परभणी ) : तुरा येथील एका शेतकऱ्याने पीकविमासाठी सातबारा काढल्यानंतर त्याचे नाव गायब झाल्याचे निदर्शनास आले. सातबाऱ्यातील दुरुस्तीसाठी तहसीलदार आणि तलाठ्याकडे हेलपाटे मारून थकलेल्या शेतकऱ्याचा तलाठी कार्यालयातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.२३ ) दुपारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. 

मुंजाभाऊ दादाराव चाळक ( 50) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मुंजाभाऊ दादाराव चाळक आणि राजेभाऊ दादाराव चाळक या दोघा भावांची तुरा येथे गट नंबर १३१ मध्ये प्रत्येकी ७१ आर जमीन आहे. पिकविमा भरण्यासाठी या जमिनीचा मुंजाभाऊ यांनी सातबारा काढला. यावेळी त्यांचे नाव त्यावर आढळून आले नाही. नाव समाविष्ट करण्यासाठी त्यांनी तलाठ्याकडे चकरा मारल्या. त्याने दाद न दिल्याने तहसीलदार भाग्यश्री देशमुख यांच्याकडेही आज दुपारी तक्रार केली. मात्र,  त्यांनी पुन्हा तलाठ्याकडे जाण्यास सांगितल्याने. 

यामुळे मुंजाभाऊ परत शिक्षक कॉलनीतील तलाठी कार्यालयात गेले. नाव गायब झाल्याच्या धक्क्याने आणि कार्यालयांचे हेलपाटे खाल्याने थकलेल्या मुंजाभाऊ यांना अस्वस्थ वाटू लागले. यातच हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.या प्रकरणी तलाठी आणि तहसिलदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बंधू राजेभाऊ चाळक आणि इतर शेतकरी यांनी पोलीस ठाण्यात केली. मुंजाभाऊ यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. गुन्हा दाखल करा यासाठी नातेवाईक यांनी प्रेत तहसीलदार यांच्या कार्यालयात नेण्यासाठी गाडीत टाकले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूparabhaniपरभणी