शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकाचा खून; फरार संस्थाचालक पती-पत्नी १२ दिवसांनी अटकेत

By राजन मगरुळकर | Updated: July 22, 2025 13:06 IST

या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंद झाल्यापासून फरार असलेल्या संस्थाचालक पती आणि पत्नी या दोघांना परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केले अटक

परभणी : पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथील हायटेक निवासी शाळेत मुलीची टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालक जगन्नाथ हेंडगे यांचा संस्थाचालकाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंद झाल्यापासून फरार असलेल्या संस्थाचालक पती आणि पत्नी या दोघांना परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. तब्बल बारा दिवसांनी प्रकरणातील दोघेही आरोपी ताब्यात घेतल्याने पोलिसांनाही यश आले आहे. 

फरार संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि रत्नमाला चव्हाण अशी ताब्यात घेतलेल्या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत. झिरो फाटा येथील हायटेक निवासी शाळेमध्ये सदरील घटना १० जुलै रोजी सायंकाळी घडली होती. यानंतर पूर्णा पोलीस ठाण्यात दोघांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला. या प्रकरणात पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील हे तपास करीत होते. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोड, मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, चालक सिद्धेश्वर शिवणकर, विलास सातपुते, शरद सावंत यांनी केली. तांत्रिक विश्लेषणासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, उपनिरीक्षक चंदन सिंह परिहार, वाघमारे, गणेश कोटकर, बालाजी रेड्डी, जयश्री आव्हाड यांनी केली. नमूद दोन्ही आरोपींना पूर्णा येथील न्यायालयात हजर केले जाणार होते.

काय आहे प्रकरण: जगन्नाथ हेंडगे यांनी त्यांची मुलगी पल्लवी हिचा प्रवेश तिसरीच्या वर्गामध्ये बाळकृष्ण सेवाभावी संस्था वाडी, तुळजापूर संचलित हायटेक रेसिडेन्शियल स्कूल झिरो फाटा येथे जून महिन्यात घेतला होता. मुलगी पल्लवी ही निवासी शाळेत एक आठवडा राहून सहा जुलै रोजी उखळद येथे परत आली. त्यानंतर शाळेत जायचे नाही, मला तेथे राहायचे नाही, असे म्हणून ती घरीच थांबली. यानंतर १० जुलै रोजी इतरत्र प्रवेश घेण्यासाठी तिचा या शाळेतील दाखला काढून आणण्यासाठी जगन्नाथ हेंडगे आणि नातेवाईक गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हायटेक रेसिडेन्शिअल स्कूलवर गेले होते. त्यावेळी जगन्नाथ हेंडगे हे शाळेच्या मुख्य कार्यालयात गेले तर सोबतचे नातेवाईक मुख्य प्रवेशद्वारावर थांबले होते. यानंतर १५ ते २० मिनिटांनी आरडाओरड करत घाबरलेल्या अवस्थेत जगन्नाथ हेंडगे तेथून बाहेर पडले. यावेळी नातेवाईकांनी काय झाले असे विचारले असता त्यांनी संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीने लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे सांगितले व उर्वरित रक्कम द्या, असे म्हणून पुन्हा मारहाण केली. घटनेनंतर नमूद दोघे हे तेथून निघून जा नाहीतर तुमच्यावर केस करतो, असे म्हणून कारमध्ये बसून निघून गेले. जगन्नाथ हेंडगे यांना जबर मार लागल्याने ते जागीच बेशुद्ध झाले. त्यांना परिसरातील काही नागरिक व नातेवाईकांनी परभणीत एका दवाखान्यात आणले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी