शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत CAA विरोधात ठराव आणला;भाजपने नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांना केले निष्कासित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 09:41 IST

परभणी जिल्ह्यातील सेलू आणि पालम पालिकेत घेतला होता ठराव

परभणी : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात नगरपालिकेत ठराव घेऊन, त्याचे समर्थन केल्याप्रकरणी सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे आणि पालमचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब गणेश रोकडे यांना भाजपातून निष्कासित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत. 

परभणी जिल्ह्यातील सेलू नगरपालिका भारतीय जनता पार्टीचा ताब्यात आहे. या नगरपालिकेची 28 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सर्वसाधारण सभेत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात ठराव मांडण्यात आला आणि तो मंजूर करण्यात आला. यासंदर्भातील वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी याप्रकरणाची चौकशी केली. त्यामध्ये तथ्य आढळल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांना पक्षातून निष्कासित केले आहे. 

याशिवाय पालम नगर पंचायतीमध्ये शहर विकास आघाडीची सत्ता असून भाजपकडे उपनगराध्यक्ष पद आहे. या नगर पंचायतीमध्ये 2 मार्च रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेतही सीएए विरोधात ठराव घेण्यात आला. याचा ठपका भाजपाचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब गणेश रोकडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनाही पक्षाने, सीएए विरोधात ठराव घेऊन त्याचे समर्थन केल्याप्रकरणी  निष्कासित केले आहे. या संदर्भातील आदेश 3 मार्च रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काढले आहेत.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाparabhaniपरभणी