लाॅकडाऊनच्या काळात गावातील बारवेचा विषय ग्रामस्थानी अजेंड्यावर घेतला होता. जवळपास दिड महिना गावातील पुरातन बारवेतील १२ ते१४ फुट गाळ श्रमदानातून उपसून पुरातन असलेल्या तसेच विस्कळीत शीळांची जमेल तशी डागडूजी सेलू तालुक्यातील रायपूर येथील ग्रामस्थांनी करून घेतली. फावल्या वेळेचा सदुपयोग म्हणून गावातील तरुणांनी हे कार्य स्वयंप्रेरणेतून केले हे विशेष. रायपूर हे अडीच हजार लोकवस्तीचं गाव, गाडेकर,सोळंके,हिंगे आडनावाचे ग्रामस्थ येथे मोठ्या प्रमाणावर आहेत. नजिकच्याच हातनूर या गावाने त्यावेळीच गावातील पुरातन बारव श्रमदानातून स्वच्छ केली आणि गावात एक पुरातन असलेला ठेवा स्वच्छ प्रतिमेने सर्वांसमोर आला. त्यानंतर रायपुर येथील ग्रामस्थांनी बारव स्च्छतेचे कांम सुरु केले. आज घडीला बारवेत नितळ पाणी पहायला मिळते.या कामासाठी रायपूर गावातील दादासाहेब गाडेकर,अंकूश गाडेकर, पांडुरंग सोळंके, हरिभाऊ, सोळंके, राजाभाऊ सोळंके, हरिभाऊ, सोळंके, प्रल्हाद गाडेकर,जिजाभाऊ हिंगे,तातेराव गायकवाड,सर्जेराव गाडेकर,लक्ष्मण गाडेकर, पांडुरंग गाडेकर,दत्तराव गाडेकर,शरद गाडेकर, सचिन गाडेकर,गुलाब गाडेकर,संजय गाडेकर,आबासाहेब गाडेकर यांनी ही किमया करून दाखविली.
ऐतिहासिक अभ्यास गटाने केली पहाणी
परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ऐतिहासिक अभ्यास गटाची स्थापना करुन जिल्ह्यातील पुरातन मंदीर,बारवा, जुन्या गढ्यांची माहिती संकलन व दस्ताऐवजीकरण प्रकल्प सुरू केला आहे. मंदिर स्थापत्य,मुर्तीशास्त्र ईतिहास विषयात गती असणारे अभ्यासक या पथकात असून ते ग्रामिण भागाचे सर्वेक्षण करीत आहेत. या गटातील मल्हारिकांत देशमुख,लक्ष्मीकांत सोनवटकर, डॉ.सीमा नानवटे,अनिल सर्वांनी,प्रल्हाद पवार,नागेश जोशी,वैजनाथ काळदाते यांनी रायपूर गावास भेट देवून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.सेलू तालुक्यातील हतनूरच्या धर्तीवर रायपूरकरांनी बारवेची लोकसहभागातून पुनर्बांधणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन गावकऱ्यांशी चर्चा केली. तसेच त्यांच्या कार्याचा गौरव केला.