महावितरण शहर विभाग एकचे वरिष्ठ तंत्रज्ञ सुधीर धानोरकर हे कंत्राटी कर्मचारी यांच्यासोबत शुक्रवारी वीज बिल वसुली करिता गोरक्षण परिसरातील कालाबावर भागात गेले होते. या ठिकाणी एका ग्राहकाचे वीज कनेक्शन यापूर्वी थकीत बिलामुळे खंडित केले होते. यानंतर पुन्हा त्या ग्राहकाने विद्युत पुरवठा अनधिकृतरित्या सुरू केल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. यावरून परिसरात असलेल्या वीज ग्राहकाची तपासणी करत असताना बबलू नावाच्या इसमाने येऊन शासकीय कामात अडथळा निर्माण करीत विद्युत पुरवठा खंडित का केला, या कारणावरून अरेरावीची भाषा वापरली तसेच गालावर चापट मारून धमकी दिल्याची फिर्याद सुधीर धानोरकर यांनी दिली. याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात खैरूनिसा बेगम शेख आली यांच्या घरातील व्यक्ती बबलू (रा.कालाबावर) याच्याविरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा तक्रार दिली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.
महावितरण कर्मचाऱ्याला चापट मारून धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:13 IST