शहरात रविवारी पावसाचा जोर वाढल्याने अग्निशमन दलाने बस स्थानक परिसरात तळ ठोकून चार तासात नाल्यातील आणि रस्त्यावर अडकलेले सर्व पाण्याला वाट करून दिली. यामुळे हा रस्ता लवकर वाहतुकीसाठी सुरू झाला. शहरात मागील दोन दिवसांमध्ये १५ ते २० ठिकाणी अडकलेले पाणी अग्निशमन दलाच्या २ वाहनांनी २ मोटर पंपच्या सहाय्याने बाहेर काढले. यासाठी ७ - ८ कर्मचाऱ्यानी प्रयन्त केले.
या ठिकाणी केले मदत कार्य
बस स्थानक रस्ता, बाबर कॉलनी, भीम नगर खदान, वसमत रोडवरील दोन कॉम्प्लेक्स, जुने आरटीओ कार्यालय परिसरातील इमारत, गव्हाणे चौक, सुभाष रोड, इकबाल कॉम्प्लेक्स, अारअार टावर, रेल्वे स्टेशन परिसर, उपनिबंधक कार्यालय, वसमत रोडवरील कॉम्प्लेक्स अशा सर्व ठिकाणी अग्निशमन दलाने मदत कार्य राबविल्याची माहिती अग्निशमन विभागप्रमुख दीपक कानोडे यांनी दिली. अजुनही दहा ते वीस ठिकाणचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.