जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांपासून पावसाने खंड दिला आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी सध्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा करत आहेत. मात्र पाऊस हुलकावणी देत आहे. शनिवारी रात्री जिंतूर तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला. सरासरी १७.६ मिमी पावसाची नोंद या तालुक्यात झाली आहे. त्याचप्रमाणे परभणी तालुक्यात १.५, गंगाखेड ०.५, पूर्णा ०.४, पालम ०.४, सेलू १.२, सोनपेठ ०.९ आणि मानवत तालुक्यात १.२ मिमी पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सध्या पाऊस गायब झाला असला तरी अपेक्षित पावसाच्या तुलनेत आतापर्यंत झालेला पाऊस अधिक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१२.८ मिमी पाऊस झाला आहे. सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक २७८.१ मिमी, पूर्णा २४८.४, जिंतूर २१६.६, पाथरी २०६.१, परभणी २१६.४, गंगाखेड १७८.२, सेलू १८५.७ आणि मानवत तालुक्यात १०१.३ मिमी पाऊस झाला आहे.