शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कार्टून दाखविण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्ष कारावास

By राजन मगरुळकर | Updated: March 12, 2024 16:53 IST

परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

परभणी : गतीमंद अल्पवयीन मुलीला चॉकलेट व मोबाईलमध्ये कार्टून दाखविण्याचे आमिष दाखवून आरोपीने अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये पूर्णा पोलीस ठाण्यात २९ मे २०२१ मध्ये गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणात परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी निकाल दिला. ज्यामध्ये आरोपीस वीस वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत माहिती अशी, पूर्णा पोलीस ठाण्यात २९ मे २०२१ ला फिर्यादी यांनी तक्रार दिली होती. ज्यात फिर्यादीची अल्पवयीन भाची ही मतिमंद असल्याचे माहित असून तिला चॉकलेट व मोबाईलमध्ये कार्टून दाखविण्याचे आमिष दाखवून शेख सोहेल शेख अखिल (रा.अली नगर, पूर्णा) याने पिडीतेवर अत्याचार केला. त्यातून पिडीता ही गर्भवती राहिली. गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केला होता. गुन्ह्यात पिडीता, आरोपी यांची वैद्यकीय तपासणी, डीएनए नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे पाठविले. त्यात आलेले अहवाल, साक्षीदाराचे जवाब, जप्त मुद्देमाल व पिडीतेची साक्ष महत्त्वाची ठरली. 

पिडीतेची साक्ष विशेष प्रशिक्षित शिक्षक यांच्यामार्फत घेण्यात आली. त्यानंतर न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदर खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. नायर यांच्या न्यायालयात चालला. मुख्य सरकारी वकील ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद गिराम यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी संतोष सानप, सपोनि. बालाजी तोटेवाड, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, अंमलदार राजीव दहिफळे, प्रमोद सूर्यवंशी, वंदना आदोडे यांनी काम पाहिले.

११ साक्षीदार तपासलेयामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस.नायर यांनी आरोपी शेख सोहेल शेख अखिल (२४) यास कलम ३७६ (२) (एन) अन्वये वीस वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास तसेच भादवी कलम ५०६ अन्वये दोन वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय