शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 15:27 IST

रविवारी मध्यरात्रीनंतर जिल्हाभरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली

ठळक मुद्दे रविवारी मध्यरात्रीनंतर जिल्ह्यात सर्वदूर हा पाऊस झाला. जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ३४.१७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

परभणी : रविवारी मध्यरात्रीनंतर जिल्हाभरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून महसूल प्रशासनाने सोमवारी सकाळी ८ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार जिल्हाभरात ८.५८ मि.मी. पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मान्सून अद्याप दाखल झाला नसला तरी मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर जिल्ह्यात सर्वदूर हा पाऊस झाला. जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ३४.१७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. परभणी तालुक्यामध्ये १०.८८ मि.मी., पालम तालुक्यात १ मि.मी., पूर्णा ०.६० मि.मी., गंगाखेड २ मि.मी., सोनपेठ १ मि.मी., सेलू २२ मि.मी., पाथरी ३ मि.मी., मानवत २.३३ मि.मी. पाऊस झाला आहे. 

बामणी मंडळात अतिवृष्टी

जिंतूर तालुक्यातील बामणी महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या मंडळात तब्बल ७५ मि.मी.पाऊस झाला असून जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा मंडळात ५६ मि.मी., बोरी मंडळात ३५ मि.मी., चारठाणा मंडळात १५ तर आडगाव मंडळात १६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 

येलदरीत विजांच्या कडकडाटासह पाऊस

येलदरी- येलदरी परिसरात ३ जून रोजी रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. दोन तास हा पाऊस झाला. येलदरी धरणाच्या नियंत्रण कक्षाने या पावसाची ५६ मि.मी. नोंद केली आहे.

सेलूत जोरदार पाऊस

सेलू- सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास सेलू तालुक्यात वादळी वाऱ्यासह  जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे सेलू शहराचा वीज पुरवठा खंडित झाला होता. अर्धा तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सेलू शहरातील सखल भागात पाणी साचले होते. सोमवारी सकाळी शहरातील बहुतांश रस्त्यावर नालीतील पाणी आणि कचरा साचला. पहिल्याच पावसात दाणादाण उडल्याचे दिसून आले. नगरपालिकेने नाल्यांची सफाई न केल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचले होते.  

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रparabhaniपरभणी