कृषिपंप विजेच्या प्रतीक्षेत
देवगाव फाटा : शासनाच्या वतीने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटारपंप देण्यात आले. यासाठी शेतकऱ्यांनी वीजजोडणी शुल्क भरले आहे. मात्र बहुतांश शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला अद्यापही वीजजोडणी देण्यात आलेली नाही.
खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त
सोनपेठ : परळी रोडवर कालव्यावरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. पाथरी रोडवर तहसील कार्यालय ते शिवाजी चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. खड्डे दुरुस्तीची मागणी होत आहे.
शासकीय कार्यालय परिसरात गाजर गवत
देवगावफाटा : सेलू शहरातील विविध शासकीय कार्यालय परिसर, मोकळे प्लाॅट, ग्रामीण भागातील मोकळी जागा आदी ठिकाणी गाजर गवत वाढले आहे. यामुळे डासांची उत्पत्ती वाढत असून, नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.
एसटीला प्रवाशांची वाढली गर्दी
सेलू : रेल्वे वाहतूक अद्यापही सुरळीत सुरू नसल्याने एसटी बसगाड्यांना गर्दी होत आहे. विशेष म्हणजे, सेलू येथील शासकीय कार्यालयातील अनेक कर्मचारी परभणी येथून ये-जा करतात तसेच सेलू येथूनही परभणीला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
राष्ट्रीयीकृत बँकेसाठी नागरिक त्रस्त
सोनपेठ : तालुक्यात एकच राष्ट्रीयीकृत बँक असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तालुक्यात विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक, व्यापारी यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, यासाठी तालुक्यात केवळ एकच राष्ट्रीयीकृत बँक असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे सोनपेठ शहरात नवीन राष्ट्रीयीकृत बँकेची मागणी नागरिकांकडून होत आहे.