शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत व्यापाºयांचा मनपावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:58 IST

महापालिका जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करीत असल्याचा आरोप करीत शहरातील व्यापाºयांनी शुक्रवारी महानगरपालिकेला टाळे ठोकण्यासाठी मोर्चा काढला. परंतु, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मनपाला टाळे ठोकता आले नाहीत. यावेळी व्यापाºयांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महापालिका जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करीत असल्याचा आरोप करीत शहरातील व्यापाºयांनी शुक्रवारी महानगरपालिकेला टाळे ठोकण्यासाठी मोर्चा काढला. परंतु, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मनपाला टाळे ठोकता आले नाहीत. यावेळी व्यापाºयांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता.एलबीटीच्या थकबाकी वसुलीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त राहुल रेखावार यांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हा व्यापारी महासंघाने शुक्रवारी दुकाने बंद ठेवून दुपारी १२ वाजेच्या सुमारास मनपाला टाळे ठोकण्यासाठी मोर्चा काढला. गांधी पार्क, नारायण चाळ, स्टेशनरोडमार्गे हा मोर्चा विसावा चौकात आल्यानंतर आंदोलनकर्त्या व्यापाºयांनी मोठे रिंगण करुन आयुक्तांची बदली करावी, व्यापाºयांकडून जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करणे थांबवावी. तसेच ज्या व्यापाºयांच्या दुकानांना सील ठोकण्यात आले आहे, ते सील तात्काळ काढण्यात यावे, आदी मागण्यांसह घोषणा दिल्या. त्यानंतर हा मोर्चा मनपासमोरील राष्ट्रीय महामार्गावर आल्यानंतर पोलिसांनी या मोर्चाला तेथेच अडविले. तेव्हा व्यापारी व पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतर व्यापाºयांनी राष्ट्रीय महामार्गावर आपले बस्तान मांडून मनपा आयुक्तांविरुद्ध घोषणाबाजी केली.यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके, सचिन अंबिलवादे यांच्यासह इतर व्यापाºयांनी संताप व्यक्त करीत भूमिका मांडली. व्यापाºयांनी महामार्गावरच बस्तान मांडल्याने पोलिसांची चांगलीच गोची झाली. परभणी- वसमत या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. त्यानंतर व्यापारी आणि पोलिसांमध्ये केवळ व्यापाºयांचे पाच प्रतिनिधी मनपात सोडण्याचा तोडगा काढण्यात आला. व्यापाºयांच्या पाच प्रतिनिधींनी मनपा आयुक्त रेखावार यांच्या कक्षामध्ये जाऊन त्यांच्याशी तब्बल तीन तास चर्चा केली. मात्र या चर्चेमध्ये कोणताही पर्याय निघाला नाही. त्यामुळे व्यापाºयांनी पुन्हा शहरातील शिवाजी चौकात धरणे आंदोलन सुरु केले. या आंदोलनात व्यापारी महासंघाच्या पदाधिकाºयांसह २०० ते ३०० व्यापारी सहभागी झाले होते.पोलिसांच्या भूमिकेमुळे व्यापारी संतापलेमोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आल्यानंतर व्यापाºयांनी रास्तारोको सुरु केला. त्यावेळी पोलीस अधिकाºयांनी मोर्चेकºयांना रास्ता रोको मागे घेण्याची विनंती केली. यावेळी व्यापारी व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर व्यापारी मनपात जात असताना क्यूआरटीच्या काही अतिउत्साही पोलीस कर्मचाºयांनी आडमुठी भूमिका घेतल्याने व्यापाºयांनी संताप व्यक्त केला. यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी काही पोलीस कर्मचाºयांना चांगलेच सुनावले. त्यानंतर या पोलीस कर्मचाºयांनी नरमाईची भूमिका घेतली.