शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

मनपाने सव्वाकोटी रुपये नियमबाह्य अदा केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:31 IST

अभिमन्यू कांबळे परभणी : परभणी महानगरपालिकेने विविध योजनांतर्गत करण्यात आलेल्या कामाच्या अनुषंगाने १ कोटी २१ लाख १ हजार ५२७ ...

अभिमन्यू कांबळे

परभणी : परभणी महानगरपालिकेने विविध योजनांतर्गत करण्यात आलेल्या कामाच्या अनुषंगाने १ कोटी २१ लाख १ हजार ५२७ रुपये नियमबाह्यरीत्या कंत्राटदार व इतर व्यक्तींना अदा केले असल्याची बाब लेखापरीक्षणात स्पष्ट झाली असून, यासंदर्भातील अहवाल नुकत्याच झालेल्या अधिवेशनात सादर करण्यात आला.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच मुंबई पार पडले. या अधिवेशनात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लेख्यांवरील लेखापरीक्षण पुनर्विलोकन अहवाल सादर करण्यात आला. त्यामध्ये परभणी महानगरपालिकेच्या वतीने नियमबाह्यरीत्या करण्यात आलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. २०१३-१४ च्या लेखापरीक्षणाच्या वेळी बांधकाम विभागाच्या खर्चाच्या अभिलेखाची तपासणी लेखापरीक्षकांनी केली असता मनपाने २४ जुलै २०१३ रोजी दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत संजय कापसे यांना ७८ लाख १० हजार ८६७ रुपये, प्रपोजल प्रिप्रेशन ऑफ प्लॅनअंतर्गत २ लाख ६७ हजार ६८४ रुपये आणि अभिव्यक्ती ॲडव्हर्टायझर्स यांना मूलभूत सोयीसुविधा कामांच्या निविदांसाठी ८ लाख ५३ हजार ७७६ रुपये, असे एकूण ८९ लाख ३२ हजार ३२७ रुपये नियमबाह्यरीत्या प्रदान केले. यासंदर्भातील अभिलेखे लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकांनी मागितले असता ती उपलब्ध करून देण्यात आली नाहीत. सदर खर्च विना निविदा करण्यात आला आहे. त्यामुळे तो लेखापरीक्षणात अमान्य करून वसुलीपात्र ठरविण्यात आला आहे. मनपा हद्दीतील मालमत्ता फेरआकारणी करण्यास मान्यता देऊनही यासंदर्भातील ठरावाची अंमलबजावणी केली नाही. या ठरावाच्या अनुषंगाने लातूर येथील मे. शिवसाई इंजिनिअरिंग असोसिएटस्‌ यांना मालमत्ता फेर आकारणीचे कंत्राट दिले होते. सदरील एजन्सीला २८ लाख रुपये मनपाने प्रदान केले. या एजन्सीने अद्यापही मालमत्ता फेर आकारणीचे काम केले नाही. मनपाने या एजन्सीला चार वेळा पत्र दिले. तरीही प्रतिसाद दिला नाही. मनपा सर्वसाधारण सभेने सदरील एजन्सी प्रतिसाद देत नसल्याने इतर एजन्सीकडून फेर आकारणीचे काम करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे सदरील कंत्राटदाराला फेर आकारणीचे काम न करताच २८ लाख रुपये दिले. मनपाची ही कृती नियमबाह्य आहे. सदरील रक्कम वसुलीपात्र असल्याचा ठपका लेखापरीक्षणात ठेवला आहे.

विद्युत साहित्य खरेदीत अनियमितता

मनपाने २०१३-१४ मध्ये परभणी येथील स्वामी समर्थ मल्टिसव्हिसेस व नांदेड येथील व्ही.जी. ट्रेडिंग कंपनी यांच्याकडून ३१ लाख २६ हजार ७४५ रुपयांचे विद्युत साहित्य घेतले होते. यासंदर्भातील निविदा जादा खपाच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्या नाहीत. त्यामुळे स्पर्धात्मक दराचा फायदा मनपाला मिळाला नाही. साहित्याच्या दर्जाची तपासणी केली नाही. संबंधितांकडून स्थानिक कर, मूल्यवर्धित कर आदी ७० हजार ५१ रुपये वसूल केले नाहीत. ३ लाख ८६ हजार ७०० रुपये जास्तीचे अदा केले. पुरवठादाराला विविध मुद्यांवर सवलत दिली व शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले गेले. असे आक्षेप लेखापरीक्षणात नोंदविले आहेत.