शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मांडूळ सापाची तस्करी; तलाठ्यासह तिघांना अटक

By मारोती जुंबडे | Updated: February 16, 2024 19:18 IST

वनविभागाची कारवाई; ८० लाखांचे मांडूळ साप जप्त

परभणी: मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या चार जणांना परभणी तालुक्यातील त्रिधारा पाटी परिसरात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले. त्यानंतर त्यांच्याकडून ३ किलो १० ग्रॅम वजनाचे साप जप्त केल्याची कारवाई केली. यामध्ये तलाठ्यासह अन्य तीन आरोपींचा समावेश आहे. या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

परभणी तालुक्यातील त्रिधारा पाटी परिसरात मांडूळ साप वर्गीय प्राण्यांची तस्करी सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर चव्हाण यांनी वन कर्मचाऱ्यांसह सापळा रचून मांडूळ साप वर्गीय प्राण्यांची तस्करी करणाऱ्या चार व्यक्तींना अटक केली. या व्यक्तीकडून चारचाकी वाहनासह तीन किलो दहा ग्रॅमचे मांडूळ साप जप्त करण्यात आले. त्यानंतर या आरोपींना प्रथम सत्र न्यायालयात उभे केले. न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत त्यांना वन कोठडी सुनावली होती. या आरोपीमध्ये तलाठी राजेश्वर स्वामी (रा. शेळगाव ता. सोनपेठ), रोहिदास वैरागर (रा. तारपांगडी जि. परभणी), संतोष पवार (रा. सरस्वती नगर, हिंगोली), गजानन गडदे (रा.सेनगाव) या आरोपींचा समावेश आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वनपरिक्षेत्राधिकारी ऋषिकेश चव्हाण हे करीत आहेत.

मांडूळ सापाला सोडले नैसर्गिक अधिवासातआरोपींकडून मांडूळ साप तपासणीसाठी पशु विकास अधिकारी डॉ. लक्ष्मण कनले, डॉ. अजय धमगुंडे यांच्याकडे पाठविण्यात आले. मांडूळ साप वन्यप्राणी हा सुदृढ अवस्थेत असून न्यायालयाने मांडूळ साप वन्यप्राण्यास त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार वनविभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली.

समाजातील अंधश्रद्धेमुळे तस्करीवन्य प्राण्यांची तस्करी समाजामधील अंधश्रद्धेमुळे होत असल्याचे विभागीय वनाधिकारी मनोहर गोखले यांनी स्पष्ट केले. या कारवाईसाठी सामाजिक वनीकरण विभागीय वनाधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, सहाय्यक वनसंरक्षक प्रकाश शिंदे, वनपाल के. एस. भंडारे, बालाजी दुधारे, के. एम. थोरे, आर.डी. खटिंग, अमीर शेख, गणेश करे आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी