शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या देवाण-घेवाणवरुन एकाचा चोकू भोसकून खून; परभणीतील घटना, दोघांवर गुन्हा

By राजन मगरुळकर | Updated: July 31, 2022 17:32 IST

पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना परभणी शहरातील खंडोबा बाजार परिसरात घडली आहे.

परभणी : पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना परभणी शहरातील खंडोबा बाजार परिसरातील एका हॉटेलसमोर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी नानलपेठ ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रफिक शेख चांद शेख उर्फ बाबा असे मयत व्यक्तीचे नाव आहे. खंडोबा बाजार परिसरातील मराठवाडा शाळेसमोर शनिवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

रफिक शेख चांद शेख हे या परिसरात मित्रासोबत उभे होते. त्यावेळी आरोपी फिरोज खान अब्दुल खान आणि शेख शाहरुख शेख रशीद (एसआरके) हे दोघे तेथे आले. रफिक शेख चांद शेख याच्यासोबत पैशाच्या देवाण-घेवाण कारणावरून झालेल्या वादात फिरोज खान अब्दुल खान याने रफिक शेख चांद शेख याच्या पोटात चाकू मारला. तसेच शेख शाहरुख शेख रशीद याने रफिक शेख चांद शेख यास गंभीर जखमी केले. यानंतर गंभीर जखमी असलेल्या रफिक शेख चांद शेख यास त्यांच्या मित्राने व नागरिकांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालय व तेथून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, यामध्ये रफिक शेख चांद शेख याचा मृत्यू झाला.

एकास घेतले ताब्यातघटनेनंतर नानलपेठ पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर पोलीस पथक घटनास्थळी हजर झाले.  सहाय्यक पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, पोलीस निरीक्षक समाधान चौरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्यासह पोलीस पथकाने पंचनामा केला. याप्रकरणी नानलपेठ ठाण्यात रहीम खान शरदल खान पठाण (रा.अमीन कॉलनी) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. फिरोज खान अब्दुल खान या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे तर दुसरा आरोपी शेख शाहरुख शेख रशीद (एसआरके) हा फरार झाला आहे. त्याचा शोध पोलीस पथक करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी