शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

विश्वासात घेऊनच निर्णय घ्या; परभणी जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या सदस्यांना आमदारांचा सल्ला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 14:36 IST

जिल्हा परिषदेचा निधी वितरित करताना सर्व सदस्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा. तसेच निधी वाटपासंदर्भात अन्याय होऊ दिला जाणार नाही. तेव्हा सदस्यांनी आपसात समन्वय राखावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना राकाँच्या तीन्ही आमदारांनी दिला आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या निधी वाटपावरुन शिवसेना आणि काँग्रेसच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील सदस्यही नाराज असल्याचे समोर आले होते.या सर्व पार्श्वभूमीवर १६ जानेवारी रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक बोलाविण्यात आली.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी, आ.विजय भांबळे, आ.डॉ.मधुसूदन केंद्रे या तिन्ही आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस राष्ट्रवादीचे सर्व २४ सदस्य उपस्थित होते.

परभणी : जिल्हा परिषदेचा निधी वितरित करताना सर्व सदस्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा. तसेच निधी वाटपासंदर्भात अन्याय होऊ दिला जाणार नाही. तेव्हा सदस्यांनी आपसात समन्वय राखावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना राकाँच्या तीन्ही आमदारांनी दिला आहे.

जिल्हा परिषदेच्या निधी वाटपावरुन शिवसेना आणि काँग्रेसच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. विरोधी पक्षाच्या सदस्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील सदस्यही नाराज असल्याचे समोर आले होते.या सर्व पार्श्वभूमीवर १६ जानेवारी रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक बोलाविण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी, आ.विजय भांबळे, आ.डॉ.मधुसूदन केंद्रे या तिन्ही आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस राष्ट्रवादीचे सर्व २४ सदस्य उपस्थित होते.

तिन्ही आमदारांनी सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. त्यानंतर निधी वाटपाबाबत अन्याय होऊ दिला जाणार नाही. जि.प.ला आधीच निधी कमी आहे. जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल. सदस्यांनी एकमेकांमध्ये समन्वय राखावा. प्रत्येकाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, सदस्यांच्या काही तक्रारी असतील तर त्या आमच्याकडे मांडा, अशा सूचना करण्यात आल्या. तसेच जिल्हा परिषदेच्या निधी वाटपासंदर्भात सर्व प्रथम समित्यांना प्राधान्य दिले जावे. तसेच राष्ट्रवादीचे सदस्य, भाजपा, रासपचे सदस्य अशा क्रमाने निधी वाटप करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. 

या बैठकीनंतर तीनही आमदारांनी भाजप, रासप व अपक्ष जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीतही निधी वाटपाविषयी सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांची बैठक घेऊन या सदस्यासमवेतही चर्चा करण्यात आली. काँग्रेस आणि शिवसेच्या सदस्यांनी समान निधी वाटप करावे, अशी मागणी केली. त्यात ७० टक्के सदस्य आणि ३० टक्के समिती असा निधी वाटपाचा प्राधान्यक्रम ठेवावा, अशी मागणी केली. त्यावर वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले. या बैठकीस शिवसेना काँग्रेसच्या १९ सदस्यांपैकी १७ सदस्य उपस्थित होते. आ.बाबाजानी दुर्राणी, आ.विजय भांबळे आणि आ.डॉ.मधुसुदन केंद्रे यांनी मंगळवारी सर्व नाराज सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यामुळे पुढील बैठकीपूर्वी निधी संदर्भात कशा पद्धतीने निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदparabhaniपरभणी