शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

परभणी लोकसभेसाठी खान्देश, संभाजीनगरातून ठरतेय महायुतीची रणनीती, वरिष्ठ नेते तळ ठोकून

By ज्ञानेश्वर भाले | Updated: April 19, 2024 18:53 IST

परभणी जिल्हा सेनेचा बालेकिल्ला असून, त्याला घेरण्यासाठी भाजपसह महायुतीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून रणनीती आखली जात आहे.

परभणी : लोकसभा निवडणुकीचा आखाडा रंगात आला असून, प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रचारात गुंतला आहे. प्रचारास निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या हातात केवळ सहा दिवसांचा कालावधीत उरला आहे. महायुतीच्या उमेदवारासाठी अधिक जोर लावत असल्याचे जिल्ह्यातील परिस्थिती आहे. यासाठी महायुतीच्या स्थानिक नेत्यांना वरिष्ठ पातळीवरून सातत्याने डोस दिले जात असल्याची स्थिती आहे. यासह खान्देश आणि छत्रपती संभाजीनगरातून महायुतीची रणनीती आखली जात असल्याची स्थिती आहे. निवडणुकीदरम्यान अधिकाधिक मतदान कसे करून घेता येईल, या दृष्टीने भाजपचे वरिष्ठ नेते परभणीत येऊन स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असल्याचे दिसून येत आहे. 

परभणी जिल्हा सेनेचा बालेकिल्ला असून, त्याला घेरण्यासाठी भाजपसह महायुतीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून रणनीती आखली जात आहे. गत ३५ वर्षांच्या इतिहासात अपवाद १३ महिन्यांचा कार्यकाळ वगळता येथून सेनेच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. मात्र, या निवडणुकीपूर्वी शिवसेना, राष्ट्रवादीत फाटाफूट झाल्याने अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. ज्यांच्यासोबत गत अनेक वर्षे युतीत राहिलेल्या उद्धवसेनेविरुद्ध भाजपला या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध मतदान मागण्याची वेळ आली आहे. यासह उद्धव सेनेच्या उमदेवारासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी प्रयत्नशील आहे. 

सेनेचा गड राखण्यासाठी त्यांच्याकडून सुद्धा रणनीती आखली जात आहे. सेनेचा गड काबीज करण्यासाठी भाजपने रणनीती आखली असून, महायुतीसाठी खान्देश आणि छत्रपती संभाजीनगर येथून रणनीती आखली जात असल्याची स्थिती आहे. जळगावहून मंत्री गिरीश महाजन आणि छत्रपती संभाजीनगरातील केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह इतर पदाधिकारी जिल्ह्यात सातत्याने येत असल्याची स्थिती आहे. तर दुसरीकडे उद्धवसेनेचे शिलेदार महाविकास आघाडीच्या नेत्यांसह आपली मोट बांधत असल्याचे दिसून येत आहे. 

परभणीसाठी संघर्ष लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून ठिकठिकाणी उमेदवार दिले आहेत. यात भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेच्या उमेदवारांसाठी महायुतीचे पदाधिकारी सामूहिक प्रयत्न करत आहेत. परंतु, परभणीतील परिस्थिती वेगळी असून, वेळेवर राष्ट्रवादीने आपली जागा राष्ट्रीय समाज पक्षाला दिल्याने महायुतीत काही ठिकाणी चलबिचल पुढे येत आहे.  त्यामुळे ‘रासप’च्या उमेदवारांसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सेनेचा बालेकिल्ला सर करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. 

कुणाची रणनीती भारीया निवडणुकीत महायुती आणि मविआमध्ये लढत होत असून शेवटच्या सहा दिवसात कुणाची रणनीती कुणावर भारी पडेल हे ४ जूनला पुढे येईल. लोकसभेच्या या रणसंग्राम १३ उमेदवार विविध पक्षांचे तर २१ जण अपक्ष रिंगणात आहे.  

जागा परभणीची, पण नेते बाहेरील  लोकसभेच्या अनुषंगाने राजकीय आकडेमोड करत राष्ट्रवादीने परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडल्याने जिल्ह्या बाहेरील उमेदवार स्वीकारण्याची वेळ महायुतीवर आली. यासह त्यांच्या प्रचारासाठी सुद्धा जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी कार्यरत असताना छत्रपती संभाजीनगर, जळगावहून जिल्ह्याची रणनीती ठरवण्यात येत असल्याने काही पदाधिकाऱ्यांत नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपला स्थानिक पातळीवरील महायुतीच्या नेत्यांवर विश्वास नाही का? असा प्रश्न चर्चिला जात आहे.

एकूण मतदार २१,२३,०५६पुरुष- ११०३८९१महिला- १०१९१३२

टॅग्स :parbhani-pcपरभणीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Mahadev Jankarमहादेव जानकरsanjay jadhav ubtसंजय जाधव