शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले
2
ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Stock Market Today: शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण, निफ्टी १०० तर सेन्सेक्स ३०० अंकानी घसरला; 'हे' शेअर्स आपटले
4
शिंदे-फडणवीसांची बंद दाराआड बैठक, महापालिका निवडणुकीबद्दल मोठा निर्णय; नेत्यांच्या फोडाफोडीवरही चर्चा
5
IndiGo: इंडिगो एअरलाइन्सच्या जखमेवर मीठ, सरकार उचलणार कठोर पाऊल!
6
सरकारी नोकरी लागताच तो प्रेम विसरला, प्रेयसीला दगा दिला; चिडलेल्या तरुणीने चांगलाच इंगा दाखवला!
7
विमान उड्डाणे रद्द! Indigo नं सरकारला दिलं उत्तर; प्रमुख ५ कारणांचा खुलासा, का आली ही वेळ?
8
Virat Kohli Deal: विराट कोहली चर्चेत... आपला ब्रँड विकून 'या' ठिकाणी करणार ४० कोटींची गुंतवणूक; कोणती आहे ही डील?
9
नाइट लाइफचे धिंडवडे; गोव्यातील क्लबला लागलेल्या आगीच्या घटनेचे देशात पडसाद उमटले
10
तुम्हाला शुगर किती? रक्त न काढताच कळेल, शास्त्रज्ञांनी विकसित केले ग्लुकोज सेन्सर
11
"तू माझी नाहीस, तर कुणाची होऊ देणार नाही"; गर्लफ्रेंडचं लग्न मोडण्यासाठी बॉयफ्रेंडनं केलं असं काही की…
12
लपाछपीचा खेळ आठ वर्षीय मुलाच्या बेतला जिवावर; चार दिवसांनंतर पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह
13
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
14
आजचे राशीभविष्य, ०९ डिसेंबर २०२५:आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल
15
भारतीय तांदळावर दुप्पट टॅरिफ लावण्याचे संकेत; अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ट्रम्प संतापले
16
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
17
सोनं झळकलं! वर्षभरात दिले ६७% रिटर्न्स, २०२६ मध्ये १० ग्रॅमचा भाव दीड लाखाच्या पुढे जाण्याचा अंदाज
18
रोजगार नव्हता… आमची लेकरं गोव्याला गेली, आता त्यांचा मृतदेहच परत येतोय; आसाममधील तीन तरुणांचा मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश
19
क्लबमालक लुथरा बंधू थायलंडला पळाले, पोलिसांचा इंटरपोलशी संपर्क; न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी, संशयिताला अटक
20
सारे काही ‘बंगाल’साठी, प्रियांका गांधींचा पलटवार; सरकारला वर्तमान, भविष्यबाबत नाही तर भूतकाळात रस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : क्षमतेपेक्षा जास्त पदाधिकारी चढल्याने युतीच्या उमेदवाराचा स्टेज कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 15:52 IST

स्टेजवर उमेदवार मोहन फड यांच्यासह भाजपा व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

ठळक मुद्दे घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

पाथरी- परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. मोहन फड यांच्या सभेचा स्टेज कोसळल्याची घटना गुरुवारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

पाथरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील घटक पक्ष रिपाइं आठवले गटाच्या वतीने गुरुवारी उमेदवारी  अर्ज दाखल करण्यासाठी आ.मोहन फड यांनी कार्यकर्त्यांना शहरातील नखाते पेट्रोलच्या बाजुला असलेल्या मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे सकाळपासूनच कार्यकर्त्यांची या मैदानावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमण्यास सुरुवात झाली. येथे उपस्थित कार्यकर्त्याना संबोधीत करण्यासाठी स्टेज उभारण्यात आला होता. दुपारी दीड वाजेच्या सुमारास या स्टेजवर उमेदवार मोहन फड यांच्यासह भाजपा व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी स्टेजच्या क्षमतेपेक्षा अधिक पदाधिकारी आल्याने अचानक हा स्टेज कोसळला. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. त्यानंतर स्टेजच्या समोर येऊन उपस्थित नेते मंडळींनी मार्गदर्शन केले. त्यानंतर माजलगावरोड-  बाजार समितीमार्गे तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. त्यानंतर आ.मोहन फड यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parabhaniपरभणीpathri-acपाथरी