शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : परभणीत आघाडी, महायुतीत बंडखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 14:28 IST

सर्वात कमी अर्ज पाथरीत , तर सर्वाधिक गंगाखेडमध्ये दाखल - अभिमन्यू कांबळे परभणी : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत विविध ...

सर्वात कमी अर्ज पाथरीत, तर सर्वाधिक गंगाखेडमध्ये दाखल- अभिमन्यू कांबळेपरभणी : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत विविध पक्षांमध्ये बंडखोरी झाली आहे़ परभणीची जागा आघाडीत काँग्रेसकडे असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी एमआयएमकडून उमेदवारी दाखल केली आहे़ गंगाखेडची जागा महायुतीत शिवसेनेकडे असताना येथे शिवसेना, भाजप, रासपच्या नेत्यांनी  बंडखोरी करीत उमेदवारी दाखल केली आहे़ तसेच आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे असताना काँग्रेसच्या जि़प़ सदस्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दाखल केली आहे़ पाथरी विधानसभा मतदारसंघ महायुतीत भाजपाकडे असताना येथून शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ जिंतूरमध्येही महायुतीत बंडखोरी झाली असून, हा मतदारसंघ भाजपकडे असताना येथून शिवसेनेच्या विधानसभा प्रमुखांनी उमेदवारी दाखल केली आहे़ तसेच रिपाइं आठवले गटाच्या राज्य संघटकांनी बंडखोरी करीत उमेदवारी दाखल केली आहे़ जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात एकूण ८८ उमेदवारांनी १२५ अर्ज दाखल केले आहेत़ त्यामध्ये सर्वात कमी अर्ज पाथरीत तर सर्वात जास्त अर्ज गंगाखेड विधानसभा मतदारसंघात दाखल झाले आहेत़  परभणी मतदारसंघातून अखेरच्या दिवशी १६ उमेदवारांनी २३ अर्ज दाखल केले़ या मतदारसंघात एकूण २८ उमेदवारांचे ३७ अर्ज दाखल झाले आहेत़ त्यामध्ये शिवसेनेकडून आ़ डॉ़ राहुल पाटील, काँग्रेसकडून रविराज देशमुख, अपक्ष सुरेश नागरे यांच्यासह अनेकांनी शुक्रवारी अर्ज दाखल केले़ गंगाखेड विधानसभा मतदार संघात आ़ डॉ़ मधुसूदन केंद्रे यांनी राष्ट्रवादीकडून तर शिवसेनेकडून विशाल कदम यांनी अर्ज दाखल केले़ माजी आ़ सिताराम घनदाट यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली़ पाथरी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून आ़ मोहन फड, काँग्रेसकडून सुरेश वरपूडकर, वंचित बहुजन आघाडीकडून भारतीय किसान सभेचे कॉ़ विलास बाबर आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ 

जिंतूर विधानसभा मतदारसंघात १९ उमेदवारजिंतूर विधानसभा मतदारसंघात अखेरच्या दिवशी ९ उमेदवारांचे १४ अर्ज दाखल झाले़ या मतदारसंघात एकूण १९ उमेदवारांनी २७ अर्ज दाखल केले आहेत़ त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ़ विजय भांबळे, भाजपाकडून मेघना बोर्डीकर, वंचित बहुजन आघाडीकडून मनोहर वाकळे यांच्यासह अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत़  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parbhani-acपरभणीgangakhed-acगंगाखेडpathri-acपाथरीjintur-acजिन्तूर