शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत युतीचे उमेदवार निश्चित; आघाडीच्या यादीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 19:04 IST

आघाडीतील ४ पैकी फक्त एकाच उमेदवाराची अधिकृतरित्या घोषणा झाली आहे़

ठळक मुद्देराष्ट्रवादीचे उमेदवार निश्चित असले तरी पक्षाने संबंधितांची यादी जाहीर केलेली नाही़ वंचित बहुजन आघाडीने चारही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली

- अभिमन्यू कांबळे

परभणी : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप-रासपा महायुतीचे चारही उमेदवार जवळपास निश्चित झाले असून, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील ४ पैकी फक्त एकाच उमेदवाराची अधिकृतरित्या घोषणा झाली आहे़ त्यातही राष्ट्रवादीचे उमेदवार निश्चित असले तरी पक्षाने संबंधितांची यादी जाहीर केलेली नाही़ 

परभणीविधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने आ़ डॉ राहुल पाटील यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे़ गंगाखेड विधानसभा मतदारसंघ यापूर्वी रासपकडे होता़ तर पाथरी मतदारसंघ शिवसेनेकडे होता़ नव्या जागा वाटपानुसार गंगाखेडची जागा शिवसेनेला देण्यात आली असून, येथून जिल्हाप्रमुख विशाल कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे़ पाथरीत भाजपचे आ़ मोहन फड यांना उमेदवारी मिळण्याचे निश्चित असले तरी पक्षाने मंगळवारी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत त्यांचे नाव नव्हते़ 

काँग्रेसने पाथरी विधानसभा मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांना पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केली़ परभणीची जागा काँग्रेसकडेच असताना येथे मात्र पक्षाने अद्यापही उमेदवार जाहीर केलेला नाही़ राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिंतूर व गंगाखेड मतदारसंघ आहेत़ या मतदारसंघाचे नेतृत्व अनुक्रमे आ़ विजय भांबळे व आ़ डॉ़ मधुसूदन केंद्रे करीत आहेत; परंतु, राष्ट्रवादीने अद्यापही उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली नाही़ असे असले तरी हे दोन्ही उमेदवार पुन्हा मैदानात उतरण्याचे निश्चित आहे़ 

वंचित बहुजन आघाडीने चारही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत़ त्यामध्ये गंगाखेडमध्ये काँग्रेसच्या जि़प़ सदस्या करुणा कुंडगीर यांना वंचितने उमेदवारी दिली असून, परभणीत राष्ट्रवादीतून वंचितमध्ये गेलेले शेख मोहंमद गौस यांना तर पाथरीत भारतीय किसानसभेचे पदाधिकारी कॉ़ विलास बाबर यांना उमेदवारी दिली आहे़ जिंतूरमध्ये मात्र मंत्रालयातील कक्ष अधिकारी पदाचा राजीनामा देऊन राजकारणात उतरलेले मनोहर वाकळे यांना वंचितने उमेदवारी दिली आहे़ एमआयएमने परभणीतून राष्ट्रवादीचे नगरसेवक अलीखान मोईनखान यांना उमेदवारी दिली आहे़ २ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील उमेदवारांचे चित्र निश्चित होण्याची शक्यता आहे़ 

जिंतूरची जागा शिवसेनेकडून रासपकडेजिंतूर विधानसभेची जागा यापूर्वी शिवसेनेकडे होती ती आता रासपकडे गेली असून, रासपकडून येथे मेघना बोर्डीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे़  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parabhaniपरभणीvidhan sabhaविधानसभा