शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत प्रमुख राजकीय पक्षांच्या जागा वाटपाचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 20:20 IST

आघाडीच्या ताब्यात प्रत्येकी २ जागा

ठळक मुद्देशिवसेना २ तर भाजपा-रासपकडे प्रत्येकी १ जागाशेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडणार

परभणी : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या जागा वाटपाचा तिढा सुटला असून, काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेनेकडे प्रत्येकी २ तर भाजपाकडे १ आणि रासपकडे १ जागा गेली आहे़ मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील एकाही प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याने शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडणार आहे़ 

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व शिवसेना-भाजपा -रासप महायुती यांच्यातील जागा वाटपाचा तिढा गेल्या अनेक दिवसांपासून सुटलेला नव्हता़ त्यामुळे आघाडी-युतीतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती़ मंगळवारी या संदर्भातील चित्र स्पष्ट झाले़ परभणी व पाथरी विधानसभेची जागा काँग्रेसला सुटली असून, जिंतूर व गंगाखेडची जागा राष्ट्रवादीकडे कायम आहे़ पाथरी विधानसभेची जागा शिवसेनेकडून भाजपाकडे गेली आहे़ त्यामुळे येथून आ़मोहन फड यांना भाजपाची उमेदवारी मिळणे निश्चित झाले आहे़ असे असले तरी भाजपाने मंगळवारी राज्यातील १२५ जागांवरील उमेदवारांची जी यादी जाहीर केली, त्यात पाथरीचा समावेश नाही़ बुधवारी या संदर्भातील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे़ जिंतूर विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपाकडेच राहील, अशी चर्चा होती; परंतु, आता ही जागा महायुतीतील मित्र पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाकडे गेली असून, माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांना रासपची उमेदवारी मिळाली आहे़ 

सहा उमेदवारांचे नऊ अर्ज दाखलउमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघातून ६ उमेदवारांनी ९ अर्ज दाखल केले आहेत़ त्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदार संघातून दोन उमेदवारांचे दोन अर्ज आले आहेत़ त्यात शिवसेनेचे विधानसभा प्रमुख राम खराबे पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला असून, संभाजी ब्रिगेड पार्टीचे बालाजी शिंदे यांनीही उमेदवारी दाखल केली आहे़ परभणी विधानसभा मतदार संघातून एका अपक्ष उमेदवाराने १ अर्ज दाखल केला आहे़ गंगाखेड विधानसभा मतदार संघातून २ उमेदवारांनी ४ अर्ज दाखल केले आहेत़ पाथरी विधानसभा मतदार संघातून एका उमेदवाराने २ अर्ज दाखल केले आहेत़ २ आॅक्टोबर रोजी शासकीय सुटी असल्याने या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही़ त्यामुळे आता ३ व ४ आॅक्टोबर असे दोन दिवस अर्ज दाखल करण्यासाठी उरले आहेत़ या दोन दिवसांत बहुतांश राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल होणार आहेत़ त्यामुळे पुढील दोन दिवस प्रशासकीय यंत्रणेसाठी कसोटीचे राहणार आहेत़ 

२५ इच्छुकांनी घेतले ५९ अर्जचार विधानसभा मतदार संघात मंगळवारी २५ इच्छुकांनी ५९ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून घेतले़ त्यामध्ये जिंतूर मतदार संघातून ४ जणांनी ६ तर परभणी मतदार संघातून ७ इच्छुकांनी २८ अर्ज घेतले आहेत़ गंगाखेड विधानसभा मतदार संघातून ६ जणांनी ९ तर पाथरी मतदार संघातून ८ इच्छुकांनी १६ अर्ज घेतले आहेत़ आतापर्यंत ४ मतदार संघात १५८ इच्छुकांनी ३३४ अर्ज घेतले आहेत़ 

मेघना बोर्डीकर यांना रासपची उमेदवारीजिंतूर विधानसभा मतदार संघ राष्ट्रीय समाज पक्षाला सुटला असून, या मतदार संघातून युवा नेत्या मेघना बोर्डीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे़ रासपकडे पूर्वी गंगाखेडची जागा होती़ ती जागा शिवसेनेकडे गेली असून, जिंतूरची शिवसेनेची जागा रासपकडे आली आहे़ या मतदार संघातून यापूर्वीच अनेक महिन्यांपासून मेघना बोर्डीकर यांनी तयारी चालविली आहे़ रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा गेल्या महिन्यातच जिंतूर येथे जाहीर कार्यक्रम झाला होता़ त्याचवेळी ही जागा रासपकडे जाईल, असे राजकीय संकेत मिळाले होते़ त्यावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले आहे़ 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parabhaniपरभणीvidhan sabhaविधानसभा