शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णेत भाविकांसाठी बनला ६० क्विंटलची भाजी आणि ५० क्विंटलच्या भाकरीचा महाप्रसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 19:09 IST

गावच्या चारही बाजूने मंदिर परिसराकडे भाविकांची रीघ...मंदिरात महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी...आणि समोरच्या दहा एकर मोकळ्या शेतात भाजी भाकरीच्या महाप्रसादासाठी लहान मोठ्यासह बसलेली पंगत..चित्र आहे तालुक्यातील अहेरवाडी येथील सजगिर महाराज हिरागिरी महाराज यांच्या यात्रेचे.

पूर्णा (परभणी) : गावच्या चारही बाजूने मंदिर परिसराकडे भाविकांची रीघ...मंदिरात महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी...आणि समोरच्या दहा एकर मोकळ्या शेतात भाजी भाकरीच्या महाप्रसादासाठी लहान मोठ्यासह बसलेली पंगत..चित्र आहे तालुक्यातील अहेरवाडी येथील सजगिर महाराज हिरागिरी महाराज यांच्या यात्रेचे. गुरुवारी सायंकाळी जवळपास २५ हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. 

अहेरवाडी (ता पूर्णा)  येथे चैत्र महिण्यात दरवर्षी सजगिर महाराज हिरागिरी महाराज यांच्या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. पंचक्रोशीसह जिल्ह्याबाहेरील हजारो भाविक या यात्रेस हजेरी लावतात. गुरुवारी या यात्रेची महाप्रसादाने सांगता झाली.

भाजी-भाकरीच्या प्रसादाला आहे महत्व भाजी करण्याची तयारी एकदिवस अगोदर पासून असते. गावातील प्रत्येक समाजातील लोक यासाठी योगदान देते. आदल्या दिवशी रात्री गावातून पालखी काढल्या जाते. यात्रेतील वांग्याची भाजी व भाकरीच्या महाप्रसादला अन्यन साधारण महत्व आहे. चार मोठ्या कलयीचा  भाजी बनविण्यात वापर झाला तर दीडशे घरातून भाकरी बनवल्या गेल्या. यासाठी ६० क्विंटल वांगी,५० क्विंटल भाकरीच्या पिठाचा उपयोग झाला. २५ हजार भक्तांच्या या  महापंगतीस बसवण्यासाठी १० एकर जागा लागली. यावेळी खा. संजय जाधव, आ. डॉ. मधुसूदन केंद्रे, डॉ. राहुल पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी सर्वांसोबत पंगतीत बसून प्रसाद घेतला. 

टॅग्स :Templeमंदिरparabhaniपरभणी