शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'मदरसा-वालूर नाका' रस्ता सेलूच्या वैभवात टाकणार भर; काम सुरु, अतिक्रमणधारकांना नोटीस

By ज्ञानेश्वर भाले | Updated: June 17, 2023 16:54 IST

चारपदरी रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला असून २४० अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत

सेलू (जि.परभणी) : शहराला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांपैकी दुर्लक्षित झालेला वालूर नाका ते मदरसा साडेतीन किमी रस्त्याचे चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला. रस्त्याचे कामही सुरू झाले आहे. यादरम्यान येणारे अतिक्रमण काढण्यात येत असून, यादरम्यान येणाऱ्या २४० अतिक्रमणधारकांना सा. बां. उपविभागीय अभियंता यांनी नोटिसा बजावल्या आहेत. नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रस्त्याचे चौपदरीकरण होणार असल्याने शहराच्या वैभवात भर टाकणारा रस्ता ठरणार आहे.

वालूर ते मदरसामार्गे सेलू असा लोहमार्गासाठी रस्ता होता. पण रस्ता आडगळीला पडला. हा दारुल उलूम उर्दू मदरसा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत असा साडेतीन कि.मी. रस्ता कामासाठी मंत्रालय स्तरावरील ३० कोटी निविदाप्रक्रियेतून २३ कोटी ७४ लाख ४३ हजार २०१ असे सर्वात कमी दर असलेली एका कंपनीस हे काम मिळाले. कार्यकारी अभियंता यांनी २४ मार्च २०२३ रोजी कार्यारंभ आदेश दिले. मदरसा ते वालूर नाका रस्त्याचे काम व चार पूल झाले आहेत. शहरातील वालूर नाका ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, असे रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी २४० जणांना लक्ष्मण नामावार उपविभागीय अभियंता सा.बां. उपविभाग सेलू यांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे शहरातील चारपदरी होणारा हा मुख्य रस्ता मोकळा श्वास घेणार आहे.

असा आसणार चारपदरी रस्ताशहरात वालूर नाका ते छत्रपती शिवाजी महाराज हा डिव्हायडरच्या दोन्ही बाजूने सहा मीटर सिमेंट रस्तालगत १.५ मीटर पेव्हर ब्लॉक फुटपाथ व १.५ मीटर नाली व कडेला वृक्षारोपण असा हा भव्य रस्ता आणि सात पूल याने सेलू शहराचे वैभव वाढविले, तर वालूर नाका ते मदरसा परभणी रस्त्यापर्यंत २० मीटरचा दोन पदरी रस्ता होत आहे, अशी माहिती सहायक अभियंता बळीराम माने यांनी दिली आहे.

ऑगस्ट महिन्यात वाहतूक सुरूसंबंधित एजन्सीकडील यंत्रसामग्री आणि मनुष्यबळामुळे हे काम प्रगतिपथावर आहे. अतिक्रमणधारकांनी स्वतः अतिक्रमण काढून घेत सहकार्य करावे. एक वर्ष मुदत असली तरी जुलै महिन्यात रस्ता वाहतुकीस सुरू होईल, असा प्रयत्न सुरू आहेत.- लक्ष्मण नामावार, उपविभागीय अभियंता सा. बां. उपविभाग

टॅग्स :parabhaniपरभणीhighwayमहामार्ग