शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी कृषी विद्यापीठात नोकर भरतीत त्रुटी; कृषिमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 12:39 IST

शासन निर्णयाप्रमाणे सोईप्रमाणे अर्थ लावून पात्र प्रकल्पग्रस्त उमेदवारांना डावलले

ठळक मुद्देयासंदर्भात उच्च न्यायालयामध्ये अनेक याचिका दाखल शासन निर्णयाचा सोयीप्रमाणे अर्थ लावल्याचे आढळले

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नोकर भरती प्रक्रियेत शासन निर्णयाचा सोयीप्रमाणे अर्थ लावल्याचे आढळले असून त्यामध्ये त्रुटी दिसून आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तसा चौकशी अहवाल राज्य शासनाला दिला असल्याची माहिती कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, परभणी येथील आ.बाबाजानी दुर्राणी, आ.सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे यांनी सभागृहात परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांच्या झालेल्या नोकर भरतीत अनियमितता झाल्याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. शासन निर्णयाप्रमाणे सोईप्रमाणे अर्थ लावून पात्र प्रकल्पग्रस्त उमेदवारांना नोकरीपासून वंचित ठेवले असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. हा प्रश्न मंगळवारी सभागृहात चर्चेला आला. त्यानुसार कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी लेखी उत्तर दिले असून त्यामध्ये कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त भरती संदर्भात विविध संघटना व राजकीय नेत्यांनी कृषीमंत्र्यांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार परभणी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. सदरील अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये भरती प्रक्रियेत त्रुटी राहिल्या असून सोईप्रमाणे शासन निर्णयाचा अर्थ लावण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयामध्ये अनेक याचिका देखील दाखल झाल्या आहेत. 

कृषिमंत्र्यांचे आश्वासननिवड समितीतील दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करणे व पात्र उमेदवारांना नोकर भरतीत सामावून घेणे, याबाबतचा निर्णय घेता आला नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयास आधीन राहून पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे सभागृहात कृषीमंत्री बोंडे म्हणाले, अशी माहिती आ.बाबाजानी दुर्राणी यांनी दिली. 

टॅग्स :Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठEducationशिक्षणState Governmentराज्य सरकार