परभणी शहरातील बी. रघुनाथ सभागृह येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखेच्या वतीने संघटन समीक्षा व संवाद मेळाव्याचे आयोजन शहरात केले होते. यावेळी दौऱ्यावर आलेल्या रेखा ठाकूर यांनी पक्ष बांधणीबाबत संवाद साधला. प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर म्हणाल्या, ओबीसींची जातीनिहाय जनगणना देशांतर्गत घेण्यात यावी तसेच ५ राज्यातील पोटनिवडणुका इम्पिरियल डाटा अभावी रद्द झाल्या आहेत. या निवडणुका कोरोनाची लाट सध्या ओसरल्याने इम्पिरियल डाटा बनवून घेण्यात याव्यात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विविध निवडणुकांसाठी पक्ष संघटनात्मक बांधणी केली जात आहे. या निमित्ताने पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवडणुका स्वबळावर लढविल्या जाणार आहेत. पत्रकार परिषदेस डाॅ. अरुंधती शिरसाठ, प्रा. डाॅ. सुरेश शेळके, आलमगीर खान, गोविंद दळवी, कलीम खान, धम्मपाल सोनटक्के, डाॅ. धर्मराज चव्हाण यांची उपस्थिती होती.
स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:39 IST