शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांनो राजीनामे नको,आपली भूमिका मांडा; सकल मराठा समाज बांधवांचे आवाहन

By ज्ञानेश्वर भाले | Updated: October 31, 2023 17:36 IST

पुढाऱ्यांना गाव बंदी केल्यामुळे त्यांना आपले घर सोडता येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहींनी आमदारकीचे राजीनामे पुढे केल्याची भावना समाज माध्यमातून पुढे येत आहे.

परभणी : गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकार पातळीवर अपेक्षितरित्या सोडवला जात नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी लोकप्रतिनिधींना गावबंदीचे केलेल्या आवाहानाची अनेक ठिकाणी अंमलबजावणी सुरू झाल्याने जवळपास सर्वच पुढारी अडचणीत सापडले आहे. त्यामुळे आपले पद ठेवून काय करणार म्हणून अनेकांनी लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांकडे राजीनामे देत मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे. परंतु संबंधितांनी राजीनामे न देता आपली भूमिका पक्ष पातळीवर तसेच ते ज्या सभागृहाचे सदस्य आहेत, त्या ठिकाणी विशेष अधिवेशन बोलवून आपली भुमिका मांडावी, अशी अपेक्षा मंगळवारी सकल मराठा समाजाने घेतलेल्या पत्रपरिषदेतून मांडली.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून टिकेल असे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलन उभारले आहेत. त्यांच्या पहिल्या टप्प्यातील आंदोलनाची मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी दखल घेऊन ४० दिवसात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याची पूर्तता न झाल्यामुळे जरांगे पाटलांनी पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाला प्रारंभ केला. परिणामी सरकारसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी अडचणीत सापडल्याची स्थिती आहे. पुढाऱ्यांना गाव बंदी केल्यामुळे त्यांना आपले घर सोडता येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहींनी आमदारकीचे राजीनामे पुढे केल्याची भावना समाज माध्यमातून पुढे येत आहे. परंतु त्यांनी राजीनामे न देता मराठा समाजाच्या भावना सभागृहात मांडून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा पत्रपरिषदेतून स्पष्ट करण्यात आली

नेत्यांनी भान ठेवून बोलावेमराठा समाज गेल्या काही वर्षापासून शांत, संयमी पद्धतीने मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी अत्यंत संयमी पद्धतीने आंदोलन, उपोषण करत आहे. परंतु समाजाची दिशाभूल करून सरकार त्यांना चुकीच्या दिशेने घेऊन जात आहे. त्यामुळे सरकारसह लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन समाजाला अस्वस्थ करण्याची सध्या वेळ आहे. परंतु काही ठिकाणी लोकप्रतिनिधी चुकीचे वक्तव्य करत असल्याने त्यांना समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तशीच काहीशी परिस्थिती बीड जिल्ह्यातमन समोर येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह सरकारने सुद्धा मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देत संयमी पद्धतीने बोलून समाजाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणparabhaniपरभणी