शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कंदील मोर्चा ! परभणीत विजेच्या भारनियमन व महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीची जोरदार घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 18:16 IST

अचानक वाढलेले विजेचे भारनियमन आणि वाढती महागाई याच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर कंदील मोर्चा काढण्यात आला. 

ठळक मुद्देविजेचे भारनियमन आणि वाढती महागाई याच्याविरोधात मोर्चा शासनाच्या चुकीच्या धोरणाचा जोरदार घोषणाबाजी करत निषेध

परभणी, दि. १३ : अचानक वाढलेले विजेचे भारनियमन आणि वाढती महागाई याच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर कंदील मोर्चा काढण्यात आला. यावेळी शासनाच्या चुकीच्या धोरणाचा जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.

दिवाळीचा सण तोंडावर आला असताना जिल्ह्यामध्ये विजेचे भारनियमन केले जात आहे. तसेच शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई वाढत चालली आहे. या दोन्ही मुद्यांवर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  मोर्चाचे आयोजन केले होते. येथील बी.रघुनाथ सभागृहापासून दुपारी १२ वाजेपासून या मोर्चाला प्रारंभ झाला. शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन धडकला. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हातात कंदील घेऊन भारनियमनाचा विरोध केला. तसेच काही काळ रास्तारोको आंदोलन करुन आपला रोष व्यक्त केला.  त्यानंतर जिल्हाधिका-यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाईमध्ये वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात केले जाणारे विजेचे भारनियमन बंद करावे, शेतक-यांचे वीज बिल माफ करावे, कापूस व सोयाबीनसाठी हमीभाव केंद्र सुरु करावे आदी मागण्याचा यात समावेश आहे. यावेळी जिल्हाध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भावनाताई नखाते, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव सोनाली देशमुख, शहर जिल्हाध्यक्षा नंदाताई राठोड, गंगासागर वाळवंटे, रेखा आवटे, संगीता पवार, राधाबाई जोंधळे, मुमताज शेख, मीना रणबावळे, सोमित्रा लझडे, वनिता चव्हाण, जयश्री पुंडगे, सूमन वाळवंटे, संगीता खुणे, बालिका शिंदे, शिला मस्के, रत्नमाला शेंडे आदींसह मोठ्या संख्येने महिलांचा आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.