शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अपहरण करून बालकांची विक्री करणारी टोळी जेरबंद; तीन गुन्हे उघड

By राजन मगरुळकर | Updated: March 9, 2023 17:31 IST

बालकाच्या अपहरणाचे तीन गुन्हे उघड; चार आरोपी वाढले

परभणी : पैशांसाठी लहान मुलांचे अपहरण करून त्यांना विकणारी आंतरराज्य टोळी परभणी पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतली. यापूर्वी कोतवाली हद्दीतील एका बालकाची सुखरूप सुटका केल्यावर आता गुरुवारी पुन्हा एकदा कोतवाली हद्दीतील अन्य एका बालकास शोधून आणण्यात पोलीसांना यश आले. पोलिसांनी या बालकास पालकांच्या स्वाधीन केले आहे. या टोळीमध्ये आता नवीन चार आरोपींची भर पडली आहे. त्यामुळे एकूण आरोपींची संख्या १५ झाली आहे.

आंतरराज्यात लहान मुलांचे अपहरण करून त्यांना लाखो रुपयांना विकणारी टोळी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या तपासातून पकडण्यात आली. त्यांच्या ताब्यातून अपहृत केलेल्या मुलांचा शोध लावण्यात आला आहे. आतापर्यंत पोलीस दलाने कोतवाली हद्दीतील दोन व पालम येथील एक गुन्हा उघडकीस आणला आहे. एप्रिल २०२२ मध्ये कोतवाली ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आठ वर्षीय मुलाचे अज्ञाताने अपहरण केले, अशा तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला होता. त्यानुसार पोलिसांनी मागील काही दिवसात तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला. त्यात तपासामध्ये पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून यात दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. अपहृत केलेल्या मुलाचा शोध लावल्यानंतर त्यास पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

अन्य दोन अपहृत बालके बालकल्याण समितीकडेया सर्व टोळीच्या माध्यमातून तपास सुरू केल्यावर पोलिसांना एकूण दोन बालके आढळून आली आहेत. यापूर्वी पालम तालुक्यातील एक मुलगा सुद्धा पोलिसांनी शोधून आणला. आतापर्यंत एकूण तीन गुन्हे उघड झाल्यावर याच आरोपींकडून अन्य दोन अपहृत बालकांचाही शोध लावण्यात पोलिसांना यश आले. या दोन अपहृत बालकांना परभणीच्या बालकल्याण समितीकडे पुढील कार्यवाहीस्तव हजर करण्यात आले आहे.

यांनी बजावली कामगिरीपोलीस अधीक्षक रागसुधा.आर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, प्रदीप काकडे, संजय करनूर यांच्या अधिपत्याखालील पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद मुळे, मारुती करवर, कल्पना राठोड, पोलीस उपनिरीक्षक राधिका भावसार, साईनाथ पुयड, मारुती चव्हाण, व्यंकट कुसुमे, नागनाथ तुकडे, शकील अहमद, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर, स्वप्निल पोतदार यांच्यासह क्युआरटी, कोतवाली, पालम, नवा मोंढा, स्थागूशा, सायबरच्या अंमलदारांनी हा तपास केला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी