रिसोड येथील तिघे जण जीप क्रमांक एमएच २८ एझेड २६४१ या वाहनाने रिसोडवरून पंढरपूरकडे जात असताना गुरुवारी रात्री १ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने धावणाऱ्या जीपला सेलू ते पाथरी रस्त्यावर एका जिनिंग परिसरात रानडुकराने धडक दिली. या धडकेत ही जीप रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. यामध्ये गजानन तुकाराम सोनवणे (३८), पंचफुला गजानन सोनवणे (३४) व चालक सर्व (रा.रिसोड) हे गंभीर जखमी झाले. या जखमींवर सेलू उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोचार करून पुढील उपचार परभणी जिल्हा रुग्णालयात सुरू आहेत. रानडुक्कर मात्र मयत झाले. घटनास्थळाची पाहणी सेलू पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक शेख मुजरीम, पोलीस नाईक गजानन गवळी, राहुल मोरे यांनी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सेलू पोलीस ठाण्यात आद्यापही गुन्हा दाखल झाला नाही.
रानडुकराच्या धडकेने जीप पलटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:16 IST