शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

आयटीआयची सत्रपरीक्षा होणार आॅनलाईन, ऐनवेळी घेतलेल्या निर्णयामुळे परभणीत विद्यार्थी गोंधळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 14:18 IST

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकविल्या जाणार्‍या ३५ अभ्यासक्रमांच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. हा निर्णय कुठलीही पूर्वसूचना न देता ऑफलाईन परीक्षेच्या पहिल्या दिवशी घेण्यात आला. या ऐनवेळी घेतलेल्या निर्णयाने परभणी येथील  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध अभ्यासक्रमाच्या (ट्रेडच्या) परीक्षेसाठी आज सकाळी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी एकत्र येत पूर्वीप्रमाणेच आॅफलाईन परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिका-यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देपरभणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सुमारे ७०० विद्यार्थी ३५ वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांची दरवर्षी आॅफलाईन पद्धतीनेच परीक्षा घेतली जाते़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी याच परिक्षेची तयारी केली. ५ व ६ फेब्रुवारी रोजी नियोजित परीक्षा होती.यानुसार आज सर्व विद्यार्थी परीक्षेसाठी प्रशिक्षण संस्थेत आले. मात्र, या परीक्षा आॅनलाईन घेतल्या जाणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिल्यानंतर एकच गोंधळ उडाला

परभणी : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकविल्या जाणार्‍या ३५ अभ्यासक्रमांच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. हा निर्णय कुठलीही पूर्वसूचना न देता ऑफलाईन परीक्षेच्या पहिल्या दिवशी घेण्यात आला. या ऐनवेळी घेतलेल्या निर्णयाने परभणी येथील  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध अभ्यासक्रमाच्या (ट्रेडच्या) परीक्षेसाठी आज सकाळी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी एकत्र येत पूर्वीप्रमाणेच आॅफलाईन परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिका-यांना निवेदन दिले. 

परभणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सुमारे ७०० विद्यार्थी ३५ वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत आहेत. जिल्हास्तरीय केंद्रांवर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची परीक्षा घेतली जाणार होती. या विद्यार्थ्यांची दरवर्षी आॅफलाईन पद्धतीनेच परीक्षा घेतली जाते़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी याच परिक्षेची तयारी केली. ५ व ६ फेब्रुवारी रोजी नियोजित परीक्षा होती. यानुसार आज सर्व विद्यार्थी परीक्षेसाठी प्रशिक्षण संस्थेत आले. मात्र, या परीक्षा आॅनलाईन घेतल्या जाणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिल्यानंतर एकच गोंधळ उडाला़ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अनेक अभ्यासक्रमामध्ये प्रत्यक्ष संगणकाचा वापर होत नाही, असे असताना संगणकावर परीक्षा घेतली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते़ त्यामुळे या निर्णयाला विरोध करीत विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला.

हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गंगाधर जवंजाळ हे देखील परीक्षा केंद्रावर दाखल झाले़ या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची  बाब त्यांनी प्राचार्यांना निदर्शनास आणून दिली़ त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यासह जिल्हाधिकार्‍यांनाही निवेदन देऊन आॅनलाईन परीक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणेच आॅफलाईन परीक्षा घेण्याची मागणी केली़ 

नवे वेळापत्रक जाहीर दोन दिवसांपूर्वीच व्यवसाय शिक्षण, प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांनी पत्र पाठवून जिल्हास्तरावर होणारी ही परीक्षा ओएमआर बेसड् (आॅफलाईन) न घेता आॅनलाईन संगणकावर परीक्षा घेण्याच्या सूचना केल्या़ आहेत. तसेच याच पत्राद्वारे परिक्षेचे वेळापत्रकही बदलल्याचे जाहीर करण्यात आले़ त्यात १७ फेब्रुवारीपासून आॅनलाईन परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिक्षेच्या नव्या बदलाचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. केंद्रावर भौतिक सुविधांचा अभावऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संगणकाशी संदर्भात एकही अभ्यासक्रम नाही़ त्यामुळे प्रशिक्षण संस्थेत संगणकांची कमतरता आहे़ प्रशासकीय कामकाजासाठी वापरल्या जाणार्‍या संगणकांवरच परीक्षा घ्यावी लागणार आहे़ त्यामुळे ही परीक्षा घेताना अडचणी निर्माण होवू शकतात़ तसेच विद्यार्थ्यांना पूर्व कल्पना न देता ऐनवेळी आॅनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होवू शकते़ अशा वेळी परीक्षेच्या संदर्भाने उचित निर्णय घ्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे़ 

सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून आॅनलाईन परीक्षा घेण्याचे पत्र आम्हाला ३ फेब्रुवारी रोजी प्राप्त झाले. या पत्रानुसार आम्ही पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे कळविले आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतच आॅनलाईन परिक्षेसाठी आजपासूनच १७ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे़ तसे बॅचेसचे नियोजनही केले आहे़ वरिष्ठांच्या निर्णयानुसार प्रशिक्षण संस्थेतील एम़ए़बी़आऱ, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स, फिटर आदी सहा अभ्यासक्रमांच्या परीक्षा आॅफलाईन पद्धतीने सुरू आहेत़ उर्वरित ३५ ट्रेडच्या परीक्षा आॅनलाईन होणार आहेत. - एम.डी. देशमुख, प्राचार्या, औद्योगिक प्रशिक्षण संस्था

टॅग्स :Studentविद्यार्थीparabhaniपरभणीiti collegeआयटीआय कॉलेज