शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

आंतरराज्य गुन्हेगारास पाठलाग करून पकडले; २० गुन्ह्यांची झाली उकल

By राजन मगरुळकर | Updated: June 27, 2023 19:06 IST

साथीदारांसह मिळून जवळपास २० ठिकाणच्या गुन्ह्याची कबुली दिली.

परभणी : हायवा, टिप्पर, चारचाकी वाहने चोरणारा आंतरराज्य गुन्हेगारास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मानवत तहसीलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शेत शिवारातून पाठलाग करुन ताब्यात घेतला. गुन्हेगाराचे वाहन बंद पडल्याने त्याने पोलिसांना चकमा देत पळ काढला. अखेर त्यास मानवत शेत शिवारातून ताब्यात घेतले. चौकशीत जवळपास २० गुन्ह्यांची उकल करण्यास पोलीसांना यश आले आहे.

जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यातील वाहन चोरीबाबत तपासासाठी व आरोपी शोधासाठी जिल्हा पोलीस दलाने तीन स्वतंत्र पथके तयार केली होती. पोलीस अधीक्षक रागसुधा.आर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, साईनाथ पूयड, मारुती चव्हाण यांचे पथक मानवत, सेलू, पाथरी हद्दीत गस्त घालत होते. रविवारी माहितीवरून विविध गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी हा (एमएच १२ जीआर ९९९५) या कारमधून मानवत ते पाथरी जाणाऱ्या रस्त्याने प्रवास करत असल्याचे पथकाला समजले. पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, विलास सातपुते, रवीकुमार जाधव, विष्णू चव्हाण, मधुकर ढवळे, निलेश परसोडे यांनी हात दाखवून वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, सदरील वाहन जोरात चालवून पाथरी ते मानवत रस्त्यावर मानवत तहसील कार्यालयाच्या पाठीमागे पडीक शेत शिवारामध्ये चालकाने नेले. हे वाहन आडमार्गाने व शेतातील धुऱ्याच्या खड्ड्याने जाताना अर्ध्या वाटेतच बंद पडले. येथे संबंधित चालक वाहून सोडून पोलिसांना चकमा देत पळाला. त्याचा पाठलाग पथकाने केला. मानवत शेत शिवारात दबा धरून बसलेल्या आरोपी विष्णू आकात यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील वाहन चोरीबाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्या साथीदारांसह मिळून जवळपास २० ठिकाणच्या गुन्ह्याची कबुली दिली. यातील विविध गुन्हे सदरील आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या ठिकाणचे गुन्हे केल्याची कबुलीमानवत चार, पालम एक, सेलू एक, सोलापूर जिल्ह्यातील विजापूर नाका एक, रायगड जिल्ह्यातील महाड एक, नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ एक, बीड जिल्ह्यातील केज एक, पुणे एक, तेलंगणा राज्यातील बासर एक, नांदेड शहरातील विमानतळ एक, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव एक, जालना जिल्ह्यातील घनसावंगी एक. बीड चकलंबा एक, पाथरी, रेणापूर, औंढा, हट्टा येथील एक. संबंधित मुख्य आरोपी विष्णू रामभाऊ आकात (रा. सातोना, ता.परतुर) याच्यासह अन्य साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले. यात चोरचाकी, हायवा, टिप्पर यासह अन्य काही वाहने चोरी केल्याचे प्रकार घडले आहेत. आरोपी विष्णू आकात हा वरील सर्व गुन्ह्यात निष्पन्न झाला असून त्याच्याकडून परभणी जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी