शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत गर्दीच्या ठिकाणी पथकाकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:08 IST

विधानसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून घातपात विरोधी पथकाने गर्दीच्या ठिकाणांची तपासणी सुरु केली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसेच घातपाताच्या कारवायांना वेळीत आळा बसावा, या उद्देशाने जिल्हा पोलीस दलाने स्थापन केलेल्या घातपात विरोधी पथकाच्या वतीने शहरात ठिकठिकाणी तपासणी सुरु करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: विधानसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून घातपात विरोधी पथकाने गर्दीच्या ठिकाणांची तपासणी सुरु केली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसेच घातपाताच्या कारवायांना वेळीत आळा बसावा, या उद्देशाने जिल्हा पोलीस दलाने स्थापन केलेल्या घातपात विरोधी पथकाच्या वतीने शहरात ठिकठिकाणी तपासणी सुरु करण्यात आली आहे.गणेशोत्सव, नरात्रोत्सव या काळातही ही मोहीम राबविली होती. नवरात्र उत्सव काळात ठिकठिकाणी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. ही मोहीम महोत्सवाच्या कालावधीतच मर्यादित न ठेवता ती सध्याही राबविली जात आहे. जिल्ह्यातील संवेदनशील स्थळे, धार्मिकस्थळे, गर्दीची ठिकाणे, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी सार्वजनिक ठिकाणांना भेटी देऊन तपासणी केली जात आहे. ११ आॅक्टोबर रोजी शहरातील बसस्थानक परिसरात ही तपासणी करण्यात आली. यावेळी बसस्थानकातील संपूर्ण परिसर अद्ययावत यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने तपासण्यात आला. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक आर.रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर नाईक यांच्या अधिपत्याखाली घातपात विरोधी पथकातील संतोष मोहळे, प्रवीण घोंगडे, इमरान खान, अमित शिराळकर, शेख शकील, संतोष वाव्हळ, सीता वाघमारे, अमोल सिरसकर, लक्ष्मण तोटेवाड, शिवाजी काळे, प्रेमदास राठोड, महारुद्र सपकाळ आदींनी ही मोहीम राबविली.२२५ ठिकाणी केली तपासणीपरभणी पोलीस दलातील घातपात विरोधी पथकाने आतापर्यंत परभणी शहरासह जिल्ह्यातील बसस्थानक, रेल्वेस्थानक, टॉकीज, मुख्य रस्ते आणि २२५ ठिकाणी तपासणी केली आहे. तपासणीनंतर परिसरातील नागरिकांना घ्यावयाची काळजी व उपाययोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ही मोहिम चालूच राहणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Policeपोलिस