शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

पाथरी तालुक्यातील १४ रेशन दुकानदारांच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 17:04 IST

 रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न माजलगाव पोलिसांनी उघड केल्यानंतर झालेल्या चौकशीत सदरील धान्य पाथरी तालुक्यातील रेशन दुकानांमधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील १४ रेशन दुकानांचे पंचनामे करुन चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार वासुदेव शिंदे संबंधितांना दिले आहेत.

ठळक मुद्दे १३ फेब्रुवारी रोजी माजलगाव पोलिसांनी पाथरी येथून आलेल्या एका टेंपोतील २०० क्विंटल रेशनचे धान्य ताब्यात घेतले होते.यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत  हे धान्य पाथरी तालुक्यातील असल्याचे स्पष्ट झाले. 

पाथरी (परभणी ) :  रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न माजलगाव पोलिसांनी उघड केल्यानंतर झालेल्या चौकशीत सदरील धान्य पाथरी तालुक्यातील रेशन दुकानांमधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील १४ रेशन दुकानांचे पंचनामे करुन चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार वासुदेव शिंदे संबंधितांना दिले आहेत.

राज्य शासनाने रेशनच्या धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत गोदामांऐवजी थेट रेशन दुकानदारांना धान्य पोहचविण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी रेशनच्या धान्याचा काळा बाजार करणारी लॉबी कायम सक्रिय असल्याचे सातत्याने उघड होत आहे. त् १३ फेब्रुवारी रोजी माजलगाव पोलिसांनी पाथरी येथून आलेल्या एका टेंपोतील २०० क्विंटल रेशनचे धान्य ताब्यात घेतले होते. यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत  हे धान्य पाथरी तालुक्यातील असल्याचे स्पष्ट झाले. 

माजलगावला रेशनच्या धान्याचा टेंपो पकडताच पाथरी येथील पुरवठा विभागाने धान्याचे परमीट वाटप केलेल्या दुकानदारांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये १४ रेशन दुकानदारांचा समावेश आहे. या सर्व दुकानदारांच्या चौकशीचेही आदेश तहसीलदार वासुदेव शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे गुरुवारी दिवसभर पाथरी येथील पुरवठा विभागाचा गोदाम कुलूपबंद होता. गोदाम बंद करुन गोदामपाल कुठे गेले होते, हे मात्र समजू शकले नाही. या प्रकरणी जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिकृत टेंपोतूनच नेले धान्यथेट द्वारपोच योजनेअंतर्गत पाथरी तालुक्यातील ७८ दुकानांमध्ये रेशनचे धान्य वितरित करण्यासाठी ६ टेंपो नियुक्त करण्यात आले होते. सदरील टेंपोंचे नंबर पुरवठा विभागाकडे उपलब्ध आहेत. या टेंपोवर स्पष्टपणे निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था महाराष्ट्र शासन असे नाव लिहिलेले आहे. त्याच टेंपोमधून माजलगाव पोलिसांनी पकडलेला रेशनचा माल नेण्यात येत होता. विशेष म्हणजे धान्य वितरण प्रणालीचे उद्घाटन डिसेंबरमध्ये याच टेंपोसमोर नारळ फोडून पुरवठा विभागाकडून करण्यात आले होते आणि तोच टेंपो आता माजलगाव पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांच्या ताब्यात आहे.

जीपीएस यंत्रणा ठरली कुचकामीरेशनच्या धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी धान्य वाहून नेणार्‍या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु, ही जीपीएस यंत्रणा कुचकामी ठरल्याचे या घटनेत दिसून येत आहे. पाथरीचा टेंपो माजलगाव येथून जात असताना संबंधित जीपीएस यंत्रणा तपासणी करणार्‍यांना कसे काय दिसले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वी पूर्णा येथे रेशनचे धान्य वितरित करणारा टेंपो वसमत येथे असल्याचे आढळले होते. चौकशीअंती तो रिकामा असल्याचे सांगण्यात आले होते.

कारवाई केली जाईलपाथरी येथील १४ दुकानदारांना परमीट दिले होते. त्यांचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना तलाठी व मंडळ अधिकारी यांना दिल्या आहेत. आलेल्या अहवालानुसार कारवाई केली जाईल.-निलेश पळसकर, नायब तहसीलदार, पाथरी  

टॅग्स :parabhaniपरभणीCorruptionभ्रष्टाचार