शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'मनरेगाचे ई-मस्टर सुरू करा'; आंदोलकांनी पाथरी पंचायत समिती कार्यालयाला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2023 14:28 IST

गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही, असे म्हणत आंदोलकांनी यावेळी पंचायत समितीच्या व्हरांड्यामध्ये ठिय्या मांडला

पाथरी (परभणी ): मनरेगांच्या कामांचे मागील दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून बंद असलेले ई-मस्टर सुरु करण्याची मागणी करत संतप्त आंदोलकांनी आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास पाथरी पंचायत समिती कार्यालयास टाळे ठोकले.

पाथरी तालुक्यामध्ये मनरेगामधून सार्वजनिक कामांमध्ये वृक्ष लागवड, मातोश्री पानंद रस्ते इत्यादी कामांना प्रशासकीय मान्यता व त्यानंतर कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. यात 96 पांदण रस्ते 20 वृक्ष लागवड , तसेच 44 अंतर्गत रस्ते  ही कामे मंजूर आहेत. परंतु, ऑक्टोबर महिन्यापासून अनेक कारणांनी पाथरी पंचायत समिती कार्यालयामधून ही मस्टर काढणे बंद आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महत्त्वाचे प्रश्न असणाऱ्या कामांना अडथळा निर्माण झाला आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पाथरी पंचायत समिती कार्यालय गटात ही ई -मस्टर तात्काळ चालू करा या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयास टाळे ठोकले .यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, आंदोलन मागणीवर ठाम होते.

दरम्यान, यावेळी पोलीस प्रशासनाकडून सपोनि बी.आर. बंदखडके यांनी आंदोलकांची समज काढली. त्यानंतर कार्यालयाला लावलेले कुलूप काढण्यात आले.  परंतु मस्टर केव्हा चालू करणार? हे गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही, असे म्हणत आंदोलकांनी यावेळी पंचायत समितीच्या व्हरांड्यामध्ये ठिय्या मांडला होता. आंदोलनात माणिकआप्पा घुंबरे, रंगनाथ वाकणकर, पांडुरंग शिंदे, अविराज टाकळकर, महेश कोल्हे, रामचंद्र आम्ले, बापु कोल्हे, अमोल शिंदे, सुरेश नखाते, शरद कोल्हे, विजय कोल्हे, गणेश यादव, विष्णू उगले, विजय नखाते आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीparabhaniपरभणी